महेश बाबूंच्या चित्रपटासाठी राजामौली साकारणार सर्वात भव्य वॉर सीक्वेंस
मुंबई, 29 जून (हिं.स.)। दिग्दर्शक एस.एस. राजामौली त्यांच्या आगामी पौराणिक एक्शनपट वाराणसीसाठी भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वात भव्य वॉर सीक्वेंसपैकी एक साकारण्याच्या तयारीत आहेत. अहवालांनुसार, या भव्य सीक्वेन्सचे चित्रीकरण 7 जुलै 2026 पासून हैदराबाद
Rajamouli Create Indian Cinema Grandest War Sequence Mahesh Babu Film


मुंबई, 29 जून (हिं.स.)। दिग्दर्शक एस.एस. राजामौली त्यांच्या आगामी पौराणिक एक्शनपट वाराणसीसाठी भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वात भव्य वॉर सीक्वेंसपैकी एक साकारण्याच्या तयारीत आहेत.

अहवालांनुसार, या भव्य सीक्वेन्सचे चित्रीकरण 7 जुलै 2026 पासून हैदराबादमध्ये सुरू होणार आहे. या (वॉर सीक्वेंस) युद्धदृश्यात अभिनेता महेश बाबू 3,500 ज्युनियर कलाकारांच्या विशाल सेनेचे नेतृत्व करताना दिसणार आहेत. व्हिज्युअल इफेक्ट्सच्या मदतीने या कलाकारांना सुमारे 50,000 वानर योद्ध्यांच्या रूपात दाखवण्यात येणार असून, त्यामुळे हे दृश्य अत्यंत भव्य आणि विशाल स्वरूपात पडद्यावर साकारले जाणार आहे.

या चित्रपटात महेश बाबू 'रुद्र' या भूमिकेत दिसणार आहेत, तर प्रियांका चोप्रा जोनास तब्बल आठ वर्षांनंतर भारतीय चित्रपटसृष्टीत पुनरागमन करत 'मंदाकिनी' ही भूमिका साकारणार आहेत. अभिनेता पृथ्वीराज सुकुमारन चित्रपटात 'कुंभ' या भूमिकेत दिसणार आहेत. चित्रपटाची कथा 'रामायण' प्रेरित असल्याचे सांगितले जात असून, त्यामध्ये पौराणिक पात्रे, नैसर्गिक आपत्ती, काल्पनिक घटना आणि वडील-मुलाच्या भावनिक नात्याला विशेष महत्त्व देण्यात आले आहे.

राजामौलींचा हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प मोठ्या प्रमाणावर साकारला जात आहे. निर्मात्यांचा दावा आहे की, हा चित्रपट तंत्रज्ञान, व्हिज्युअल इफेक्ट्स आणि कथानकाच्या स्तरावर प्रेक्षकांना एक वेगळाच सिनेमॅटिक अनुभव देईल. 'वाराणसी' हा चित्रपट जगभरातील चित्रपटगृहांमध्ये 7 एप्रिल 2027 रोजी प्रदर्शित करण्याची योजना आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule


 rajesh pande