'अवारपन २' चित्रपटाचा टीझर प्रदर्शित
मुंबई, 29 जून (हिं.स.)। अभिनेता इम्रान हाश्मीच्या बहुप्रतिक्षित ''अवारपन २'' चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला आहे. २००७ च्या सुपरहिट चित्रपट ''अवारपन''च्या सिक्वेलमध्ये, इम्रान पुन्हा एकदा ''शिवम पंडित''च्या भूमिकेत दिसणार आहे. टीझरमधील त्य
Teaser Released Film Awarapan 2


मुंबई, 29 जून (हिं.स.)। अभिनेता इम्रान हाश्मीच्या बहुप्रतिक्षित 'अवारपन २' चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला आहे. २००७ च्या सुपरहिट चित्रपट 'अवारपन'च्या सिक्वेलमध्ये, इम्रान पुन्हा एकदा 'शिवम पंडित'च्या भूमिकेत दिसणार आहे. टीझरमधील त्याची गंभीर आणि भावनिक शैली प्रेक्षकांना आकर्षित करत आहे. यावेळी त्याच्यासोबत दिशा पाटनी आहे, जी टीझरमध्ये थोडक्यात दिसली आहे.

टीझरची सुरुवात शिवम पंडितच्या संवादाने होते, काही कथा स्वतःच्या इच्छेने संपत नाहीत; त्यांची कथा इतरांसाठी लिहिलेली असते. त्यानंतर इम्रानचे पात्र त्याच्या भूतकाळात आणि एका नवीन लढाईत संघर्ष करताना दिसते. मुस्तफा जाहिद यांनी गायलेले चित्रपटातील लोकप्रिय गाणे 'तो फिर आओ' पार्श्वभूमीवर वाजते, ज्यामुळे टीझर भावनिक आणि प्रभावी बनतो. शबाना आझमी देखील या चित्रपटात एक महत्त्वाची भूमिका साकारत आहेत.

नितिन कक्कड़ दिग्दर्शित या चित्रपटाची निर्मिती विशेष भट्ट यांनी केली आहे. निर्मात्यांचा दावा आहे की, 'आवारपन २' पहिल्या भागाचा भावनिक वारसा पुढे नेईल आणि प्रेक्षकांना रोमान्स, एक्शन व भावनांचा एक नवीन प्रवास सादर करेल. हा चित्रपट १४ ऑगस्ट २०२६ रोजी देशभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होईल.

---------------

हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule


 rajesh pande