

वॉशिंग्टन, 29 जून (हिं.स.)भारतीय बॅडमिंटनपटू किदाम्बी श्रीकांतचे यूएस ओपन सुपर 300 बॅडमिंटन स्पर्धा जिंकण्याचे स्वप्न अपूर्ण राहिले. पुरुष एकेरीच्या अंतिम सामन्यात त्याला चायनीज तैपेईच्या ह्सू ली-यांगकडून तीन गेमच्या लढतीत पराभव पत्करावा लागला. जागतिक क्रमवारीत ३८ व्या क्रमांकावर असलेल्या श्रीकांतने पहिला गेम गमावला, पण त्याने जोरदार पुनरागमन केले होते. मात्र, जागतिक क्रमवारीत ४६ व्या क्रमांकावर असलेल्या सुच्या वेगाशी तो जुळवून घेऊ शकला नाही आणि अखेरीस एका तासाहून अधिक काळ चाललेल्या या सामन्यात तो १५-२१, २१-१६, ९-२१ असा पराभूत झाला.
गेल्या वर्षी श्रीकांत मलेशिया मास्टर्स सुपर ५०० आणि सय्यद मोदी इंटरनॅशनल सुपर ३०० स्पर्धेतही उपविजेता ठरला होता. या हंगामातील श्रीकांतचा हा पहिलाच अंतिम सामना होता. सुने त्याच्या चुकांचा फायदा उचलला आणि पहिल्या गेमची चांगली सुरुवात करत ७-२ अशी आघाडी घेतली. श्रीकांतने जोरदार पुनरागमन करत पुढील ११ पैकी आठ गुण जिंकले आणि स्कोअर १०-१० असा बरोबर केला. तथापि, ब्रेकनंतर, चायनीज तैपेईच्या खेळाडूने रॅलीचा वेग वाढवत पुनरागमन केले आणि १७-१२ अशी आघाडी घेतली. त्यानंतर स्यूने सहा गेम पॉईंट्स मिळवले. भारतीय बॅडमिंटनपटूने एक गुण वाचवला, पण नंतर शटल बाहेर मारल्यामुळे स्यूने १७ मिनिटांत पहिला गेम जिंकला.
दुसऱ्या गेममध्ये, श्रीकांतने सलग तीन गुण जिंकून ७-४ अशी आघाडी घेतली, पण स्यूने लवकरच ८-८ अशी बरोबरी साधली. भारतीय खेळाडूने एका शानदार बॅकहँड क्रॉस-कोर्ट नेट शॉटने १०-८ अशी आघाडी घेतली. श्रीकांतने आपली आघाडी कायम ठेवत ती १८-१३ पर्यंत वाढवली आणि नंतर सात गेम पॉईंट्स मिळवले. स्यूने तीन गेम पॉईंट्स वाचवले, पण श्रीकांतने एका जोरदार स्मॅशने सामना बरोबरीत आणला.
निर्णायक गेममध्ये, स्यूने आक्रमक सुरुवात केली आणि ४-१ अशी आघाडी घेतली. भारतीय बॅडमिंटनपटूकडून चुका झाल्या, तर चायनीज तैपेईच्या खेळाडूने आपला आक्रमक खेळ सुरू ठेवत आपली आघाडी १५-७ पर्यंत वाढवली. श्रीकांतच्या आणखी एका चुकीच्या रिटर्ननंतर सु ने १२ मॅच पॉईंट्स मिळवले. भारतीय बॅडमिंटनपटूने एक पॉईंट वाचवला, पण त्याला आपली लढत पुढे चालू ठेवता आली नाही आणि सु ने आपल्या कारकिर्दीतील पहिले BWF वर्ल्ड टूर विजेतेपद पटकावले.
---------------
हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे