गुजरातमध्ये 131 अवैध बांगलादेशी नागरिक ताब्यात
अहमदाबाद, 03 जून (हिं.स.) : गुजरातच्या अहमदाबादमध्ये पोलिसांनी अवैध घुसखोरांविरोधात मोठी मोहीम राबवत 290 हून अधिक संशयितांना ताब्यात घेतले आहे. यापैकी 131 जण बांगलादेशी नागरिक असून ते भारतात बेकायदेशीररित्या राहत असल्याचे प्राथमिक चौकशीत समोर आले आ
संग्रहित फोटो


अहमदाबाद, 03 जून (हिं.स.) : गुजरातच्या अहमदाबादमध्ये पोलिसांनी अवैध घुसखोरांविरोधात मोठी मोहीम राबवत 290 हून अधिक संशयितांना ताब्यात घेतले आहे. यापैकी 131 जण बांगलादेशी नागरिक असून ते भारतात बेकायदेशीररित्या राहत असल्याचे प्राथमिक चौकशीत समोर आले आहे. उर्वरित सुमारे 160 संशयितांची सखोल चौकशी सुरू असल्याची माहिती गुन्हे शाखेने दिली.

अहमदाबाद गुन्हे शाखा आणि स्थानिक पोलिसांनी उशिरा रात्री संयुक्त कारवाई करत शहरातील चंडोला, गुलाबनगर आणि खोडियारनगर परिसरात छापेमारी केली. या विशेष मोहिमेदरम्यान 290 हून अधिक संशयितांना ताब्यात घेण्यात आले.चौकशीत 131 जणांची ओळख अवैधरित्या वास्तव्यास असलेल्या बांगलादेशी घुसखोर म्हणून पटली आहे. तसेच इतर संशयितांच्या कागदपत्रांची आणि नागरिकत्वाशी संबंधित माहितीची पडताळणी सुरू आहे.पोलिस अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, शहरभर दस्तावेज पडताळणी आणि अंमलबजावणी मोहीम राबविण्यात येत असून संशयितांच्या ओळखीची आणि नागरिकत्वाची खातरजमा केली जात आहे. या प्रकरणात पुढील कायदेशीर कारवाई सुरू असल्याचे अहमदाबाद पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

महत्त्वाचे मुद्दे :

-अहमदाबादमध्ये अवैध घुसखोरांविरोधात विशेष मोहीम

290 हून अधिक संशयितांना ताब्यात

131 जण बांगलादेशी नागरिक असल्याचे निष्पन्न

सुमारे 160 संशयितांची चौकशी सुरू

दस्तावेज व नागरिकत्व पडताळणीची प्रक्रिया सुरू

पुढील कायदेशीर कारवाई सुरू असल्याची पोलिसांची माहिती.

----------------

हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी


 rajesh pande