एम्स नागपूरने 4 मेगावॅट क्षमतेचा सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्यासाठी महाप्रीत बरोबर केला सामंजस्य करार
नागपूर, 03 जून (हिं.स.)। शाश्वत विकास आणि नवीकरणीय ऊर्जेचा अवलंब करण्याप्रति आपली वचनबद्धता अधोरेखित करत, एम्स(AIIMS), अर्थात अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था, नागपूरने आपल्या परिसरात 4 मेगावॅट क्षमतेचा सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्यासाठी ''महाप्रीत''
AIIMS Nagpur Signs MoU with MAHAPREIT


नागपूर, 03 जून (हिं.स.)। शाश्वत विकास आणि नवीकरणीय ऊर्जेचा अवलंब करण्याप्रति आपली वचनबद्धता अधोरेखित करत, एम्स(AIIMS), अर्थात अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था, नागपूरने आपल्या परिसरात 4 मेगावॅट क्षमतेचा सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्यासाठी 'महाप्रीत' (महात्मा फुले रिनीवेबल एनर्जी अँड इन्फ्रास्ट्रक्चर टेक्नॉलॉजी लिमिटेड) बरोबर सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली.

एम्स नागपूरचे कार्यकारी संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. प्रशांत पी. जोशी आणि महाप्रीतचे मुख्य महाव्यवस्थापक संतोष वहाणे यांनी दोन्ही संस्थांच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत या सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली.

महाप्रीत ही 'महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळा'ची (एमपीबीसीडीसी) पूर्ण मालकीची उपकंपनी आहे. हे महामंडळ महाराष्ट्र शासनाचा एक सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम (PSU) असून, तो संपूर्ण राज्यात नवीकरणीय ऊर्जा आणि शाश्वत पायाभूत सुविधांच्या उपक्रमांना चालना देण्याचे काम करतो.

एम्स नागपूरने स्वच्छ आणि नवीकरणीय ऊर्जेच्या वापराला प्रोत्साहन देण्यासाठी सातत्याने अनेक उपक्रम हाती घेतले आहेत. संस्थेत 2019 पासून सोलर एनर्जी कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (एसईसीआय) च्या माध्यमातून 500 किलोवॅट क्षमतेचा सौर उर्जा प्रकल्प कार्यरत आहे. आपली हरित ऊर्जा पायाभूत सुविधा अधिक बळकट करण्याच्या उद्देशाने, एनटीपीसी विद्युत व्यापार निगम लिमिटेड (एनव्हीव्हीएन) च्या माध्यमातून अतिरिक्त 200 किलोवॅट क्षमतेची 'रूफटॉप' (छतावरील) सौर ऊर्जा प्रणाली उभारली जात आहे.

प्रस्तावित 4 मेगावॅट क्षमतेचा सौर ऊर्जा प्रकल्प हा एम्स नागपूरच्या, अधिक ऊर्जा कार्यक्षमता प्राप्त करण्याच्या, कार्बन फूटप्रिंट (उत्सर्जन) कमी करण्याच्या आणि पर्यावरणपूरक शाश्वत संस्थात्मक पद्धतींना प्रोत्साहन देण्याच्या प्रवासातील आणखी एक महत्त्वाचा टप्पा आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule


 rajesh pande