दिल्लीतील मालवीय नगरमधील रेस्टॉरंटमध्ये आग; 21 जणांचा मृत्यू, बचावकार्य सुरु
नवी दिल्ली , 03 जून (हिं.स.)।दिल्लीतील मालवीय नगर परिसरातील हौजरानी येथील एका रेस्टॉरंटमध्ये बुधवारी सकाळी भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. या घटनेत 21 जणांचा मृत्यू झाला असून मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आग लागण्याचे नेमके कारण अ
दिल्लीतील मालवीय नगरमधील रेस्टॉरंटमध्ये आग; १० जणांचा मृत्यू, बचावकार्य सुरु


नवी दिल्ली , 03 जून (हिं.स.)।दिल्लीतील मालवीय नगर परिसरातील हौजरानी येथील एका रेस्टॉरंटमध्ये बुधवारी सकाळी भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. या घटनेत 21 जणांचा मृत्यू झाला असून मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आग लागण्याचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. संबंधित रेस्टॉरंट इमारतीच्या तळघरात चालत होते. आग लागल्यानंतर ती झपाट्याने संपूर्ण इमारतीत पसरली.

अग्निशमन दलाच्या माहितीनुसार, सकाळी ९.४५ वाजता आग लागल्याची माहिती मिळाली. त्यानंतर अग्निशमन दलाच्या 10 गाड्या तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या. अग्निशमन दलाच्या पथकाने तातडीने कारवाई करत तळघरात अडकलेल्या तिघांना सुरक्षित बाहेर काढले आणि त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल केले.

नेहरू प्लेस अग्निशमन केंद्राचे विभागीय अधिकारी (डीओ) रविंदर हे घटनास्थळी उपस्थित राहून संपूर्ण बचाव आणि अग्निशमन मोहिमेवर देखरेख ठेवत आहेत. सध्या आग पूर्णपणे नियंत्रणात आणण्यात आली असून, या प्रकरणाचा तपास सुरू आहे. इमारतीत अजूनही काही लोक अडकले आहेत का, याची खात्री करण्यासाठी अग्निशमन दलाचे अधिकारी शोध आणि बचाव मोहीम राबवत असून, उर्वरित व्यक्तींचा शोध सुरू आहे. अधिकाऱ्यांच्या मते, घटनेबाबतची सविस्तर माहिती अद्याप प्रतीक्षेत आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande