भारत-अमेरिका द्विपक्षीय व्यापार आराखडा करार अंतिम टप्प्यात
नवी दिल्ली , 03 जून (हिं.स.)। भारत आणि अमेरिका यांच्यात 1 जूनपासून व्यापार कराराबाबत (ट्रेड डील) चर्चा सुरू आहे. वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाने बुधवारी माहिती दिली की, सेक्शन 301 अंतर्गत प्रस्तावित शुल्कवाढीच्या (टॅरिफ) उपाययोजनांबाबत भारत अमेरिकेस
टॅरिफ मुद्द्यावर भारत-अमेरिका चर्चेत: वाणिज्य, उद्योग मंत्रालय


नवी दिल्ली , 03 जून (हिं.स.)। भारत आणि अमेरिका यांच्यात 1 जूनपासून व्यापार कराराबाबत (ट्रेड डील) चर्चा सुरू आहे. वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाने बुधवारी माहिती दिली की, सेक्शन 301 अंतर्गत प्रस्तावित शुल्कवाढीच्या (टॅरिफ) उपाययोजनांबाबत भारत अमेरिकेसोबत सातत्याने चर्चा करत आहे. यासोबतच द्विपक्षीय व्यापार आराखडा कराराला अंतिम स्वरूप देण्याच्या दिशेनेही दोन्ही देशांमध्ये काम सुरू आहे.

वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाच्या अधिकृत निवेदनानुसार, अमेरिकेच्या व्यापार प्रतिनिधी कार्यालयाने (यूएसटीआर) भारतासह 60 अर्थव्यवस्थांनी आयात मालावर निर्बंध घालण्यासाठी अवलंबलेल्या उपाययोजनांची चौकशी पूर्ण केली आहे. या तपासणीनंतर यूएसटीआरने 1974 च्या अमेरिकन व्यापार कायद्यातील सेक्शन 301 अंतर्गत या 60 अर्थव्यवस्थांमधून होणाऱ्या आयातीवर अतिरिक्त शुल्क लावण्याचा प्रस्ताव मांडला आहे. मात्र, ज्या उत्पादनांवर आधीच सेक्शन 232 अंतर्गत शुल्क लागू आहे, तसेच काही इतर श्रेणींतील वस्तूंना या प्रस्तावित उपाययोजनांमधून वगळण्यात आले आहे. वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाने आपल्या निवेदनात म्हटले आहे की, “सेक्शन 301 अंतर्गत सुरू असलेल्या प्रक्रियेच्या संदर्भात भारत अमेरिकेसोबत सातत्याने चर्चा करत आहे.”

मंत्रालयाने पुढे सांगितले की, भारत आणि अमेरिका व्यापार आराखडा कराराला अंतिम रूप देण्यासाठी समांतर चर्चाही करत आहेत. या संदर्भातील घोषणा 2 फेब्रुवारी 2026 रोजी करण्यात आली होती आणि 7 फेब्रुवारी रोजी दोन्ही देशांनी संयुक्त निवेदन जारी केले होते.

सरकारने स्पष्ट केले की,अमेरिकेकडून प्रस्तावित करण्यात आलेल्या शुल्कवाढीच्या उपाययोजना अद्याप अंतिम झालेल्या नाहीत. संबंधित भागधारकांना 22 जूनपर्यंत सार्वजनिक सुनावणीत सहभागी होऊन आपली मते मांडण्याचे निमंत्रण देण्यात आले आहे. तसेच, लेखी सूचना आणि आक्षेप 6 जुलैपर्यंत सादर करता येणार आहेत. या प्रस्तावित उपाययोजनांवरील सार्वजनिक सुनावणी 7 जुलै रोजी होणार असून त्यानंतर यूएसटीआर प्राप्त कागदपत्रे, सूचना आणि साक्षींचा आढावा घेऊन अंतिम निर्णय घेईल.

दरम्यान, प्रस्तावित व्यापार कराराला पुढे नेण्यासाठी आणि शुल्क, बाजारपेठेतील प्रवेश तसेच गैर-शुल्क अडथळ्यांशी संबंधित मुद्द्यांचे निराकरण करण्यासाठी दोन्ही देशांच्या व्यापार अधिकाऱ्यांमध्ये गेल्या काही महिन्यांत अनेक फेऱ्यांच्या चर्चा झाल्या आहेत. सरकारने सांगितले की, द्विपक्षीय व्यापार करारासंदर्भातील सल्लामसलत प्रक्रिया सुरू असून अमेरिकन अधिकाऱ्यांसोबतच्या चर्चा पुढेही सुरू राहतील.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande