विधानपरिषद निवडणूक : महायुतीकडून १७ उमेदवारांची घोषणा
मुंबई, 03 जून (हिं.स.) : विधानपरिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघांतील निवडणुकीसाठी महायुतीने बुधवारी आपल्या 17 अधिकृत उमेदवारांची यादी जाहीर केली. भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत ही घोषणा केली. यावेळी राष्ट्
विधान भवन लोगो


मुंबई, 03 जून (हिं.स.) : विधानपरिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघांतील निवडणुकीसाठी महायुतीने बुधवारी आपल्या 17 अधिकृत उमेदवारांची यादी जाहीर केली. भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत ही घोषणा केली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सुनील तटकरे आणि शिवसेनेचे खासदार राहुल शेवाळे उपस्थित होते.

यासंदर्भात चव्हाण यांनी सांगितले की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली जागावाटपाची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे. चार जूनपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत असून काही ठिकाणी झालेली बंडखोरी थांबवण्यात महायुतीला यश आल्याचा त्यांनी दावा केला.स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघांमध्ये नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य आणि इतर स्थानिक लोकप्रतिनिधी मतदान करतात. पहिल्या पसंतीच्या मताला या निवडणुकीत विशेष महत्त्व असल्याने मतदारांनी अधिकृत महायुती उमेदवारांनाच प्रथम पसंतीचे मत द्यावे, असे आवाहनही त्यांनी केले.महायुतीचे सर्व 17 उमेदवार विजयी होतील, असा विश्वास व्यक्त करताना चव्हाण यांनी नाराज कार्यकर्त्यांना अपक्ष उमेदवारी अर्ज मागे घेण्याचे आवाहन केले. तसेच भविष्यात अशा कार्यकर्त्यांचा विचार महामंडळे व विविध समित्यांमध्ये केला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

महायुतीचे जाहीर उमेदवार

नागपूर – डॉ. राजीव भास्करराव पोतदार

भंडारा-गोंदिया – अविनाश आनंदराव ब्राह्मणकर

वर्धा-चंद्रपूर-गडचिरोली – अरुण हनुमंत लखानी

अमरावती – प्रवीण रामचंद्र पोटे

सोलापूर – राजेंद्र विठ्ठल राऊत

अहमदनगर (अहिल्यानगर) – प्राजक्त प्रसादराव तनपुरे

जळगाव – नंदकिशोर भागवत महाजन

सांगली-सातारा – धैर्यशील ज्ञानदेव कदम

नांदेड – अमरनाथ अनंतराव राजुरकर

धाराशिव (उस्मानाबाद)-लातूर-बीड – बसवराज माधवराव पाटील

छत्रपती संभाजीनगर-जालना – सुहास त्र्यंबकराव शिरसाट

ठाणे – रवींद्र सदानंद फाटक

यवतमाळ – दुष्यंत सतीश चतुर्वेदी

परभणी-हिंगोली – सय्यद शेरगुल खान

नाशिक – नरेंद्र बेकाजी दराडे

रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग – अनिकेत सुनील तटकरे

पुणे – विक्रम संजय काकडे

महायुतीच्या तिन्ही पक्षांच्या नेत्यांच्या स्वाक्षरीचे अधिकृत पत्रक लवकरच प्रसिद्ध केले जाणार असल्याचेही सांगण्यात आले. महायुतीने या सर्व 17 जागांवर विजय मिळवण्याचे लक्ष्य ठेवले आहे.

-----------------

हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी


 rajesh pande