आरबीआयच्या मॉनेटरी पॉलिसी कमिटीची आढावा बैठक सुरू; रेपो दर कायम राहण्याची शक्यता
नवी दिल्ली/मुंबई, 03 जून (हिं.स.)। रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (आरबीआय)च्या मॉनेटरी पॉलिसी कमिटीची (एमपीसी) तीन दिवसीय द्वैमासिक आढावा बैठक बुधवारी सुरू झाली. एमपीसीच्या निर्णयांची माहिती आरबीआयचे गव्हर्नर संजय मल्होत्रा शुक्रवारी, ५ जून रोजी जाहीर करणा
RBI pay dividend Central government


नवी दिल्ली/मुंबई, 03 जून (हिं.स.)। रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (आरबीआय)च्या मॉनेटरी पॉलिसी कमिटीची (एमपीसी) तीन दिवसीय द्वैमासिक आढावा बैठक बुधवारी सुरू झाली. एमपीसीच्या निर्णयांची माहिती आरबीआयचे गव्हर्नर संजय मल्होत्रा शुक्रवारी, ५ जून रोजी जाहीर करणार आहेत. तज्ज्ञांच्या मते, जागतिक अनिश्चिततेमुळे केंद्रीय बँक यावेळीही धोरणात्मक रेपो दरात कोणताही बदल करणार नाही.

आरबीआयच्या सहा सदस्यीय चलनविषयक धोरण समितीची (एमपीसी) तीन दिवसीय आढावा बैठक आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रा यांच्या अध्यक्षतेखाली ३ ते ५ जूनदरम्यान पार पडणार आहे. या बैठकीत घेण्यात आलेल्या धोरणात्मक निर्णयांची घोषणा संजय मल्होत्रा ५ जून रोजी करतील.

तज्ज्ञांच्या मते, पश्चिम आशियातील संकट, भू-राजकीय तणाव, महागाईबाबतच्या चिंता आणि रुपयावरील दबाव यामुळे आरबीआय यावेळीही धोरणात्मक आढावा बैठकीत रेपो दर ५.२५ टक्क्यांवर कायम ठेवू शकते. तसेच, आर्थिक घडामोडींचे जाणकार सांगतात की एमपीसीकडून यावेळी रेपो दरात कोणताही बदल होण्याची अपेक्षा नाही. मात्र, वाढत्या ऊर्जा किमती, रुपयाचे कमकुवत होत जाणारे मूल्य आणि पुरवठा साखळीतील अडथळ्यांमुळे आरबीआय आपल्या महागाईच्या अंदाजात वाढ करू शकते, असे त्यांचे मत आहे.

विशेष म्हणजे, एप्रिलमधील चलनविषयक आढावा बैठकीत आरबीआयने पश्चिम आशियातील संकटाच्या पार्श्वभूमीवर ऊर्जा पुरवठा, महागाई आणि आर्थिक वाढीवरील परिणामांचा आढावा घेण्यासाठी ‘पाहा आणि प्रतीक्षा करा’ ही भूमिका स्वीकारली होती. त्यामुळे धोरणात्मक व्याजदर अर्थात रेपो दर ५.२५ टक्क्यांवर अपरिवर्तित ठेवण्यात आला होता.

---------------

हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule


 rajesh pande