ऍक्सिस म्युच्युअल फंडाचा एमएसएमई क्षेत्रात प्रवेश
‘ऍक्सिस अकाउंट प्लस’द्वारे डिजिटल वर्किंग कॅपिटल व्यवस्थापनाची सुविधा मुंबई, 30 जून (हिं.स.) : ऍक्सिस म्युच्युअल फंडाने कॉर्पोरेट्स आणि सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांसाठी (एमएसएमई) ‘अॅक्सिस अकाउंट प्लस’ हे भारतातील पहिले एंड-टू-एंड डिजिटल वर्किंग क
ऍक्सिस म्युच्युअल फंड लोगो


‘ऍक्सिस अकाउंट प्लस’द्वारे डिजिटल वर्किंग कॅपिटल व्यवस्थापनाची सुविधा

मुंबई, 30 जून (हिं.स.) : ऍक्सिस म्युच्युअल फंडाने कॉर्पोरेट्स आणि सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांसाठी (एमएसएमई) ‘अॅक्सिस अकाउंट प्लस’ हे भारतातील पहिले एंड-टू-एंड डिजिटल वर्किंग कॅपिटल मॅनेजमेंट सोल्यूशन सादर केले आहे. या सुविधेमुळे व्यवसायांना त्यांच्या अतिरिक्त निधीची डेट आणि लिक्विड म्युच्युअल फंड योजनांमध्ये डिजिटल पद्धतीने गुंतवणूक करून त्यावर परतावा मिळवण्याची संधी उपलब्ध होणार आहे.

या प्लॅटफॉर्मवर ऑनबोर्डिंग, केवायसी, फोलिओ निर्मिती, गुंतवणूक, त्याच दिवशी रिडेम्प्शनची सुविधा, मेकर-चेकर नियंत्रण प्रणाली आणि एकत्रित डॅशबोर्ड अशा अनेक डिजिटल सुविधा उपलब्ध आहेत. त्यामुळे व्यवसायांचे खेळते भांडवल अधिक कार्यक्षमतेने व्यवस्थापित करता येणार आहे.ऍक्सिस म्युच्युअल फंडाच्या माहितीनुसार, देशातील बँकांच्या करंट अकाउंटमध्ये सुमारे 25 लाख कोटी रुपयांचा निधी कोणताही परतावा न मिळता पडून आहे. तसेच उद्यम पोर्टलवर 8.6 कोटींहून अधिक एमएसएमई नोंदणीकृत असून, या क्षेत्रासाठी गुंतवणुकीचा मोठा वाव असल्याचे कंपनीने म्हंटले आहे.

यावेळी ऍक्सिस एएमसीचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी बी. गोपकुमार यांनी सांगितले की, या नव्या सोल्यूशनच्या माध्यमातून देशातील 2 ते 3 टक्के एमएसएमई आणि कॉर्पोरेट्सपर्यंत पोहोचण्याचे कंपनीचे उद्दिष्ट आहे. अतिरिक्त रोकड प्रभावीपणे गुंतवून व्यवसायांना अधिक आर्थिक कार्यक्षमता मिळवून देणे हा या उपक्रमाचा प्रमुख हेतू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.ऍक्सिस अकाउंट प्लस हे सोल्यूशन अॅक्सिस म्युच्युअल फंडाच्या संकेतस्थळावर कॉर्पोरेट्स आणि एमएसएमईंसाठी उपलब्ध करण्यात आले आहे. व्यवसायांच्या अतिरिक्त निधीच्या व्यवस्थापनासाठी आधुनिक, सुरक्षित आणि पूर्णपणे डिजिटल पर्याय म्हणून या सुविधेकडे पाहिले जात आहे.

--------------------------

हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी


 rajesh pande