ट्रम्प यांचा मोठा निर्णय; कीथ सॉन्डरलिंग बनणार अमेरिकेचे नवे कामगार सचिव
वॉशिंग्टन , 30 जून (हिं.स.)। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या प्रशासनात पुन्हा एक मोठा बदल करत कीथ सॉन्डरलिंग यांची कामगार मंत्री (लेबर सेक्रेटरी) पदासाठी उमेदवारी जाहीर केली आहे. अमेरिकेत मंत्र्यांना सचिव असे संबोधले जाते. सध्य
ट्रम्प यांचा मोठा निर्णय; कीथ सॉन्डरलिंग बनणार अमेरिकेचे नवे कामगार सचिव


वॉशिंग्टन , 30 जून (हिं.स.)। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या प्रशासनात पुन्हा एक मोठा बदल करत कीथ सॉन्डरलिंग यांची कामगार मंत्री (लेबर सेक्रेटरी) पदासाठी उमेदवारी जाहीर केली आहे. अमेरिकेत मंत्र्यांना सचिव असे संबोधले जाते. सध्या कार्यवाहक कामगार सचिव म्हणून जबाबदारी सांभाळत असलेल्या सॉन्डरलिंग यांच्या कायमस्वरूपी नियुक्तीसाठी आता अमेरिकन सिनेटची मंजुरी आवश्यक आहे.

माजी कामगार सचिव लोरी चावेझ-डीरेमर यांच्या राजीनाम्यानंतर हे पद रिक्त झाले होते. त्यानंतर ट्रम्प यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्रुथ सोशलवर कीथ सॉन्डरलिंग यांच्या नावाची घोषणा केली. या वेळी त्यांनी म्हटले की, सॉन्डरलिंग यांनी आपल्या संपूर्ण कारकिर्दीत मेहनती अमेरिकन कामगारांच्या हितासाठी काम केले असून, नव्या जबाबदारीतही ते उत्कृष्ट कामगिरी करतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

कीथ सॉन्डरलिंग हे एप्रिलपासून कार्यवाहक कामगार सचिव म्हणून विभागाचे नेतृत्व करत आहेत. यापूर्वीही त्यांनी ट्रम्प प्रशासनात अनेक महत्त्वाच्या पदांवर काम केले आहे. व्यवसायाने ते वकील आहेत. कीथ सॉन्डरलिंग हे डोनाल्ड ट्रम्प यांच्या पहिल्या कार्यकाळात अनेक महत्त्वाच्या पदांवर कार्यरत. त्यांनी अमेरिकन समान रोजगार संधी आयोग (ईईओसी) मध्ये रिपब्लिकन सदस्य म्हणून काम केलं आहे. उप कामगार सचिव पदाची जबाबदारीही त्यांनी सांभाळली आहे. त्यांनी कामगार विभागाचे मुख्य परिचालन अधिकारी (सीओओ) म्हणूनही कार्य केले. गेल्या वर्षी ट्रम्प यांनी त्यांची ईईओसीमधून कामगार विभागात बदली करून मुख्य परिचालन अधिकारी म्हणून नियुक्ती केली होती. त्यांच्या प्रदीर्घ प्रशासकीय अनुभवाच्या आधारे ट्रम्प यांनी त्यांची स्थायी कामगार सचिव पदासाठी उमेदवारी जाहीर केली आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande