फिफा विश्वचषक 2026: पॅराग्वेचा चार वेळचे चॅम्पियन जर्मनीला पराभवाचा धक्का
मॅसॅच्युसेट्स (अमेरिका), 30 जून (हिं.स.) । पराग्वेने ''राउंड ऑफ ३२'' मध्ये जर्मनीचा पराभव करून २०२६ फिफा विश्वचषकातील सर्वात मोठा धक्कादायक निकाल नोंदवला. व्हीएआर वाद, हुकलेल्या पेनल्टी आणि बचाव फळीची जबरदस्त जिद्द अशा नाट्यमय घडामोडींनंतर चार वे
पॅराग्वेचा फुटबॉल संघ


मॅसॅच्युसेट्स (अमेरिका), 30 जून (हिं.स.) । पराग्वेने 'राउंड ऑफ ३२' मध्ये जर्मनीचा पराभव करून २०२६ फिफा विश्वचषकातील सर्वात मोठा धक्कादायक निकाल नोंदवला. व्हीएआर वाद, हुकलेल्या पेनल्टी आणि बचाव फळीची जबरदस्त जिद्द अशा नाट्यमय घडामोडींनंतर चार वेळा विजेतेपद मिळवणारा जर्मनीचा संघ फुटबॉल विश्वचषकातून बाहेर पडला आहे.

१२० मिनिटांच्या अटीतटीच्या लढतीनंतर सामना १-१ असा बरोबरीत सुटला. त्यानंतर झालेल्या पेनल्टी शूटआउटमध्ये जर्मनीचा संघ दबावाखाली आला आणि त्यांनी तीन महत्त्वाच्या पेनल्टी वाया घालवल्या; तर पराग्वेने संयम राखत ऐतिहासिक विजय मिळवला आणि पुढील फेरीत धडक मारली.

अतिरिक्त वेळेत जोनाथनने गोल करून जर्मनीला विजय मिळवून दिल्यासारखे वाटले होते, पण गोलच्या आधी झालेल्या 'फाउल'मुळे व्हीएआर तपासणीनंतर तो गोल रद्द करण्यात आला आणि सामना पेनल्टी शूटआउटमध्ये गेला.

नियमित आणि अतिरिक्त वेळेत सामना १-१ असा बरोबरीत राहिल्यानंतर, पेनल्टी शूटआउटमध्ये दक्षिण अमेरिकन संघाने ४-३ असा विजय मिळवला. जोस कॅनालेने ऐतिहासिक 'सडन-डेथ' पेनल्टीवर गोल करत पराग्वेला 'अंतिम १६' मध्ये पोहोचवले आणि ज्युलियन नागेल्समन यांच्या बलाढ्य संघाला अमेरिकेच्या भूमीवरून स्पर्धेतून बाहेर पडण्याची कटू वेळ सहन करावी लागली.

दक्षिण अमेरिकन संघाचा गोलकीपर ऑर्लँडो गिलने महत्त्वाची भूमिका बजावली. त्याने जर्मन फुटबॉलपटूंच्या चाली अचूक ओळखल्या आणि आपल्या संघाला सामन्यात आघाडीवर ठेवले. त्याने काई हाव्हर्ट्झ आणि निक वोल्टमेडे यांच्या पेनल्टी रोखून संघाचा 'हिरो' म्हणून कामगिरी केली, तर जोनाथन ता यालाही आपली पेनल्टी साधता आली नाही. पराग्वेसाठी, जोस कॅनाले याने शांतपणे निर्णायक पेनल्टीवर गोल केला आणि स्पर्धेतील सर्वात मोठा धक्कादायक विजय निश्चित करत संघाला 'राउंड ऑफ १६' मध्ये नेले.

पराग्वेने पेनल्टी घेताना कोणतीही चूक केली नाही आणि ऐतिहासिक विजय निश्चित केला. त्यांच्या शेवटच्या पेनल्टीनंतर प्रचंड जल्लोष साजरा करण्यात आला. ज्युलिओ एन्सिओने ४२ व्या मिनिटाला पराग्वेला आघाडी मिळवून दिली होती, तर ५२ व्या मिनिटाला काई हाव्हर्ट्झने हेडरद्वारे गोल करत सामना बरोबरीत आणला होता.

---------------

हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे


 rajesh pande