नाशिक - बनावट शालार्थ आयडी प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेकडे
नाशिक, 04 जून (हिं.स.) -राज्यभरात गाजलेल्या बनावट शालार्थ आयडी प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्याकडे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी सोपवला आहे. बनावट शालार्थ आयडी प्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात दि. १२ मार्च रोजी गुन्हा दाखल क
नाशिक - बनावट शालार्थ आयडी प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेकडे


नाशिक, 04 जून (हिं.स.) -राज्यभरात गाजलेल्या बनावट शालार्थ आयडी प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्याकडे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी सोपवला आहे.

बनावट शालार्थ आयडी प्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात दि. १२ मार्च रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याची व्याप्ती, गांभीर्य, आर्थिक गुंतागुंत व तपासाची क्लिष्टता बघून पोलीस आयुक्तांनी हा तपास मिटके यांच्याकडे देण्याचा निर्णय घेतला. बनावट शालार्थ आयडी प्रकरणात यापूर्वी नाशिक पोलिसांनी सेवानिवृत्त शिक्षण उपसंचालक नितीन उपासनी, धुळे येथील मनोज रामचंद्र पाटील, चोपडा येथील निलेश निंबा पाटील, अविनाश पाटील, दत्तात्रय पाटील यांना अटक केली होती.

या गुन्ह्याचा तपास नाशिकरोड पोलीस ठाण्याचे तत्कालिन वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक गिरी करीत होते. तपासादरम्यान त्यांनी या गुन्ह्यातील संशयित शरद शिंदे, किरण पाटील आणि अविनाश पाटील यांच्याशी संगनमत करुन तपासी अधिकाऱ्याच्या अपरोक्ष पुराव्यात फेरफार केल्याने त्यांना निलंबित करण्यात आले होते. या प्रकरणामध्ये आर्थिक व्यवहार, बनावट कागदपत्रांचा वापर याचा समावेश असल्याने गुन्ह्याचा तपास गुंतागुंतीचा असल्याने पोलीस आयुक्तांनी या गुन्ह्याचा तपास मिटके यांच्याकडे वर्ग केला.

---------------

हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV


 rajesh pande