परभणीत दुचाकीसह कृषी पंप चोरीच्या गुन्ह्याची उकल, 82 हजारांचा मुद्देमाल जप्त
परभणी, 04 जून (हिं.स.)। जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यात नोंद असलेल्या दुचाकी आणि शेतकर्यांच्या कृषी पंपाच्या चोरीच्या गुन्ह्यांचा तपास करीत असताना स्थानिक गुन्हे शाखेला मिळालेल्या गुप्त माहितीवरून केलेल्या कारवाईत आरोपी रोहित सुरेश पवार आणि शेख मुज
परभणीत दुचाकीसह कृषी पंप चोरीच्या गुन्ह्याची उकल, 82 हजारांचा मुद्देमाल जप्त


परभणी, 04 जून (हिं.स.)। जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यात नोंद असलेल्या दुचाकी आणि शेतकर्यांच्या कृषी पंपाच्या चोरीच्या गुन्ह्यांचा तपास करीत असताना स्थानिक गुन्हे शाखेला मिळालेल्या गुप्त माहितीवरून केलेल्या कारवाईत आरोपी रोहित सुरेश पवार आणि शेख मुजम्मील यांना ताब्यात घेण्यात आले.

चौकशी दरम्यान आरोपीने परभणी, जिंतूर, पूर्णा, चुडावा, पिंपळदरी, पाथरी आणि भोकर जि. नांदेड पोलीस ठाणे हद्दीत दुचाकी आणि शेतकर्यांचे पाण्यातील कृषीपंप चोरी केल्याची कबुली दिली. यावेळी आरोपीकडून परभणी ग्रामीण पोलिसांच्या गुन्ह्यातील 13 हजार रुपये, जिंतूर पोलिसांच्या गुन्ह्यातील 16 हजार रुपये, पूर्णा पोलिसांच्या गुन्ह्यातील 10 हजार रुपये, चुडावा पोलिसांच्या गुन्ह्यातील 12 हजार रुपये, पिंपळदरी पोलिसांच्या गुन्ह्यातील 16 हजार रुपये, पाथरी पोलिसांच्या गुन्ह्यातील 13 हजार रुपये आणि भोकर जि. नांदेड पोलिसांत दाखल असलेल्या गुन्ह्यातील हिरो होंडा शाइन कंपनीची दुचाकी आणि रोख रक्कम 30 हजार रुपये असा एकूण 82 हजार 800 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

---------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande