राज बार देहव्यापार प्रकरणातील फरार आरोपी नवी मुंबईतून जेरबंद; तीन दिवसांची पोलीस कोठडी
नांदेड, 04 जून (हिं.स.)। राज बारमध्ये सुरू असलेल्या देहव्यापार प्रकरणातील फरार आरोपी (रा. कोपरखैरणी, नवी मुंबई) याला रामतीर्थ पोलिसांनी अटक केली आहे. न्यायालयाने आरोपीस तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. राज बारवर झालेल्या कारवाईदरम्यान सहा म
राज बार देहव्यापार प्रकरणातील फरार आरोपी नवी मुंबईतून जेरबंद; तीन दिवसांची पोलीस कोठडी


नांदेड, 04 जून (हिं.स.)।

राज बारमध्ये सुरू असलेल्या देहव्यापार

प्रकरणातील फरार आरोपी (रा. कोपरखैरणी, नवी मुंबई) याला रामतीर्थ पोलिसांनी अटक केली आहे. न्यायालयाने आरोपीस तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. राज बारवर झालेल्या कारवाईदरम्यान सहा महिला देहव्यापार करत असल्याचे आढळून आले होते. या प्रकरणात देहव्यापारासाठी मुली पुरवल्याच्या आरोपाखाली याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल झाल्यानंतर तो फरार झाला होता.

फरार आरोपीचा शोध घेण्यासाठी रामतीर्थ पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक शिवराज नरवाडे यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथक तयार करण्यात आले होते. पोलीस उपनिरीक्षक शिवराज नरवाडे व पोलीस अंमलदार नागरगोजे यांनी सातत्याने पाठपुरावा करून आरोपीचा ठावठिकाणा शोधून त्याला कोपरखैरणी (नवी मुंबई) येथून ताब्यात घेतले. आरोपीला रामतीर्थ येथे आणून न्यायालयासमोर हजर करण्यात आले. तपासासाठी पोलिसांनी कोठडीची मागणी केली असता न्यायालयाने तीन दिवसांची पोलीस कोठडी मंजूर केली असल्याची माहिती पोलीस उपनिरीक्षक शिवराज नरवाडे यांनी दिली. दरम्यान, राज बारमध्ये सुरू असलेल्या कथित देहव्यापाराच्या प्रकारामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली होती. या प्रकरणातील इतर आरोपींचा शोध यापूर्वीच घेण्यात आला असून त्यांना न्यायालयातून जामीन मिळाला आहे. मात्र, हा फरार असल्याने पोलिसांकडून त्याचा शोध सुरू होता. अखेर रामतीर्थ पोलिसांनी त्याला कोपरखैरणी (नवी मुंबई) येथून जेरबंद करण्यात यश मिळवले असून, त्याच्या अटकेमुळे प्रकरणाच्या तपासाला आणखी गती मिळणार आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis


 rajesh pande