इराण-अमेरिका चर्चेला वेग, करार झाल्यास होर्मुझ सामुद्रधुनी खुली होणार- ट्रम्प
वॉशिंग्टन , 04 जून (हिं.स.)।अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले आहे की, इराणसोबत सुरू असलेली चर्चा सकारात्मक दिशेने पुढे जात आहे. दोन्ही देशांमध्ये करार झाल्यास सामरिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाची असलेली होर्मुझ सामुद्रधुनी तात्काळ खु
अमेरिका भारतासह ६० देशांवर नवीन आयात शुल्क लादण्याच्या तयारीत


वॉशिंग्टन , 04 जून (हिं.स.)।अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले आहे की, इराणसोबत सुरू असलेली चर्चा सकारात्मक दिशेने पुढे जात आहे. दोन्ही देशांमध्ये करार झाल्यास सामरिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाची असलेली होर्मुझ सामुद्रधुनी तात्काळ खुली केली जाईल. मात्र, कोणताही करार निश्चित होईल याची अद्याप हमी देता येणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

व्हाईट हाऊसमध्ये पत्रकारांशी बोलताना ट्रम्प म्हणाले की, इराणसोबतची चर्चा “अत्यंत चांगली” सुरू असून सर्व काही सुरळीत राहिल्यास आठवड्याच्या अखेरीस मोठी प्रगती दिसून येऊ शकते. त्यांनी सांगितले की, इराणसोबतच्या चर्चेत काहीही घडू शकते, त्यामुळे अंतिम निकालाबाबत सध्या निश्चितपणे काही सांगता येणार नाही.

ट्रम्प यांनी दावा केला की, सामंजस्य करारावर स्वाक्षरी होताच होर्मुझ सामुद्रधुनीतील सागरी वाहतूक पुन्हा सुरळीत होईल. त्यांनी सांगितले की, अमेरिका तेथे आधीच समुद्रातील बारूदी सुरंग हटविणारी जहाजे तैनात करून ठेवली आहेत. जगातील तेल आणि नैसर्गिक वायू व्यापारासाठी हा जलमार्ग अत्यंत महत्त्वाचा मानला जातो.

अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी इराणच्या संवर्धित युरेनियम साठ्याबाबतही मोठे वक्तव्य केले. त्यांनी म्हटले की, अमेरिका या सामग्रीवर नियंत्रण मिळवू इच्छिते आणि ती सुरक्षितपणे हाताळण्याची क्षमता केवळ अमेरिका आणि चीनकडेच असल्याचे त्यांचे मत आहे. “आम्ही ते मिळवू,” असे ट्रम्प म्हणाले.

दुसरीकडे, इराणकडून चर्चेबाबत तितका उत्साह दिसून आलेला नाही. इराणचे परराष्ट्रमंत्री अब्बास अराघची यांनी सांगितले की, अमेरिका आणि इराण यांच्यात संपर्क सुरू असला तरी अद्याप कोणत्याही ठोस प्रगतीची चिन्हे दिसत नाहीत. ते म्हणाले की, इराणी जनतेच्या हक्कांची हमी मिळाल्यानंतर, लेबनॉनमधील युद्ध संपल्यानंतर आणि प्रादेशिक तणाव कमी झाल्यानंतरच औपचारिक चर्चेला गती मिळू शकते.

अराघची यांनी लेबनॉनची राजधानी बेरूतवर संभाव्य हल्ल्याबाबतही इशारा दिला. इस्रायलने बेरूतवर हल्ला केल्यास त्याचे गंभीर परिणाम होतील आणि संघर्ष पुन्हा मोठ्या प्रमाणात भडकू शकतो, असे त्यांनी म्हटले. तसेच, इराणची सशस्त्र सेना पूर्णपणे सतर्क असून गरज भासल्यास प्रत्युत्तर देण्यासाठी सज्ज असल्याचा दावा त्यांनी केला.

दरम्यान, या प्रदेशातील तणाव कायम आहे. अलीकडेच कुवेत आंतरराष्ट्रीय विमानतळावर झालेल्या प्राणघातक हल्ल्यात एका भारतीय नागरिकाचा मृत्यू झाला, तर ६३ जण जखमी झाले. भारताने या हल्ल्याचा तीव्र निषेध करत सर्व पक्षांना नागरी ठिकाणांवरील हल्ले थांबविण्याचे आवाहन केले आहे. एकूणच, अमेरिका आणि इराण यांच्यातील चर्चा सुरू असली तरी लेबनॉन, इस्रायल आणि आखाती प्रदेशातील वाढत्या तणावामुळे पश्चिम आशियातील परिस्थिती अद्याप अत्यंत संवेदनशील आणि अनिश्चित राहिली आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande