लिबर्टी जनरल इन्शुरन्सतर्फे 'लिबर्टी सायबर रिझोल्यूशन' विमा योजनेचा शुभारंभ
मुंबई, 04 जून (हिं.स.) – लिबर्टी जनरल इन्शुरन्सने भारतात नुकताच ''लिबर्टी सायबर रिझोल्यूशन™'' या विमा योजनेचा शुभारंभ केला आहे. सदर योजना सर्वसमावेशक सायबर विमा सुरक्षा कवच असून ते संस्थांना दिवसेंदिवस वाढत चाललेल्या सायबर धोक्यांच्या तसेच त्याप
लिबर्टी जनरल इन्शुरन्स


मुंबई, 04 जून (हिं.स.) – लिबर्टी जनरल इन्शुरन्सने भारतात नुकताच 'लिबर्टी सायबर रिझोल्यूशन™' या विमा योजनेचा शुभारंभ केला आहे. सदर योजना सर्वसमावेशक सायबर विमा सुरक्षा कवच असून ते संस्थांना दिवसेंदिवस वाढत चाललेल्या सायबर धोक्यांच्या तसेच त्यापासून निर्माण होणाऱ्या गुंतागुंतीचा सामना अधिक आत्मविश्वासाने, स्पष्टपणे करण्यासाठी तयार करण्यात आलेला असून यात दीर्घकालीन मदतीची सुविधा आहे.

भारतातील व्यावसायिक संस्था डिजिटल तंत्रज्ञानाचा अवलंब झपाट्याने करत चालल्या आहेत, परंतु त्यासोबतच सायबर धोके देखील तितक्याच वेगाने वाढले आहेत. हे धोके अधिक अत्याधुनिक, एकमेकांशी जोडलेले गेलेले त्याचबरोबर मोठ्या प्रमाणात कंपन्यांचे नुकसानही करत आहेत. रॅन्समवेअर (ब्लॅकमेलिंग करणारे) हल्ले, डेटा चोरी होणे, कंपनीचे कामकाज ठप्प होणे, पुरवठा साखळीत अडथळे येणे आणि कंपनीच्या प्रतिष्ठेला धक्का पोहोचणे, अशा अनेक आव्हानांचा यात समावेश आहे. त्यामुळे, आजच्या काळात संस्थांना विमा सुरक्षा उपायांची गरज अधिक प्रमाणात वाढली आहे. हे सुरक्षा पर्याय केवळ पारंपारिक विमा संरक्षणापुरते मर्यादित न राहता त्यापेक्षा अधिक मदतीची गरज निर्माण झालेली आहे.

लिबर्टी म्युच्युअल'ची जागतिक आर्थिक ताकद आणि विशेष जोखीम व्यवस्थापनातील अनेक दशकांचा अनुभव यावर आधारलेला 'लिबर्टी सायबर रिझोल्यूशन™' हा एक लवचिक आणि ग्राहकांच्या नुकसान भरपाईवर विशेष लक्ष केंद्रित करणारा सायबर विमा पर्याय आहे. सायबर संकट आल्यास या योजनेत २४/७ (दिवसरात्र) उपलब्ध असणारी मदत, समर्पित अशीसायबर रिस्क इंजिनिअरिंग क्षमता, या क्षेत्रात जोखीमेचे अचूक मूल्यमापन तसेच क्लेम एक्सपर्ट्सचे भक्कम पाठबळ लाभलेले आहे.

या विमा योजनेच्या शुभारंभप्रसंगी बोलताना लिबर्टी जनरल इन्शुरन्सचे सीईओ आणि पूर्णवेळ संचालक श्री. पराग वेद म्हणाले, “‘लिबर्टी सायबर रिझोल्यूशन™’ विमा योजनेचा शुभारंभ करत आम्ही लिबर्टीचा जागतिक सायबर क्षेत्रातील अनुभव, विशेष क्षमता आणि जोखमींविषयीचे सखोल ज्ञान भारतातील कंपन्यांसाठी त्याचबरोबर व्यवसायांसाठी उपलब्ध करून दिले आहे. त्यामुळे व्यावसायिक विमा क्षेत्रातील आमच्या विमा योजना अधिक बळकट झाल्या आहेत. व्यावसायिक संस्था ज्या पद्धतीने डिजिटल परिवर्तनाचा स्वीकार करत आहेत आणि त्यांचे कामकाज अन्य संस्थांशी अतिशय वेगाने जोडले जात असल्याने सायबर हल्ल्यांना तोंड देण्याची आणि त्यातून सावरण्याची क्षमता ही व्यवसायांसाठी आता अत्यंत महत्त्वाची आणि प्राधान्याची बाब बनली आहे.”

या योजनेविषयी अधिक माहिती देताना श्री. वेद म्हणाले, “‘लिबर्टी सायबर रिझोल्यूशन™’ ही विमा योजना विशेष जोखीम मूल्यमापन, रिस्क इंजिनिअरिंगबाबत (तंत्रज्ञानाचा वापर करुन धोक्यांवर मात करणे) अचूक माहिती आणि नुकसान भरपाईसाठी त्वरित मदत या घटकांना एकत्रित करते. त्यामुळ‌े कंपन्यांना तसेच संस्थांना सातत्याने बदलणाऱ्या सायबर धोक्यांच्या वातावरणात अधिक आत्मविश्वासाने वाटचाल करण्यास मदत होणार आहे. या नवीन योजनेच्या शुभारंभातून भविष्यातील आव्हानांना तोंड देण्यास सक्षम असणारे विमा पर्याय उपलब्ध करून देण्याच्या आमची वचनबद्धता दिसून येते. त्याचबरोबर नव्याने निर्माण होणारे धोके दूर केले जातात आणि वेगाने डिजिटल तंत्राच्या लाटेवर स्वार होत असलेल्या अर्थव्यवस्थेमध्ये कंपन्यांना तसेच व्यवसायांना दीर्घकालीन लवचिकता आणि भक्कम असे सुरक्षा कवच निर्माण करण्यासाठी मदतसुध्दा केली जाते, हेही यातून दिसून येते.”

योजनेच्या शुभारंभप्रसंगी बोलताना लिबर्टी जनरल इन्शुरन्सच्या कमर्शियल लाईन्स आणि रीइन्शुरन्स विभागाच्या अध्यक्षा (उत्पादन आणि अंडररायटिंग) श्रीमती गिशा जॉर्ज म्हणाल्या, “आजच्या काळात सायबर धोक्यांचे प्रमाणच वाढलेले नसून, त्यांची गुंतागुंत आणि व्याप्ती देखील अतिशय वेगाने बदलत चालली आहे. सायबर हल्ल्यासारखी दुर्घटना घडण्यापूर्वी, दुर्घटना घडत असताना आणि घडल्यानंतरही सर्व टप्प्यांवर मदत करू शकतील, अशा विमा योजनेची कंपन्यांना आता गरज निर्माण झालेली आहे. ‘लिबर्टी सायबर रिझोल्यूशन™’ या सर्वसमावेशक विमा योजनेत तत्पर दावापुर्तीबाबत सहाय्य, रिस्क इंजिनिअरिंगबाबत तज्ज्ञांची सहाय्यता आणि जागतिक सायबर अनुभव यांचे एकत्रिकरण आहे. या योजनेमुळे कंपन्यांना तसेच संस्थांना त्यांची सायबर हल्ल्यांना रोखणारी प्रतिकारशक्ती अधिक सक्षम करण्यास त्याचबरोबर सायबर हल्ल्यासारख्या घटनांना अधिक प्रभावीपणे तोंड देण्यास मदत मिळते.”

विम्यातील संरक्षणाची प्रमुख वैशिष्ट्ये खालीलप्रमाणे :

१)स्थानिक कौशल्यासह लिबर्टीचे जागतिक दर्जाचे प्रमुख उत्पादन

२) विस्तारित विमा संरक्षणात प्रतिष्ठेचे नुकसान, स्वतःच्या सायबर मालमत्तेचे नुकसान, धमक्यांचे व्यवस्थापन, नुकसानीचा पुरावा तयार करण्याचा खर्च आणि गुन्हेगाराचा सुगावा लावणाऱ्यासाठी बक्षीस यांचा समावेश करण्यात आलेला आहे

३) कंपनी प्रमुखाच्या कुटुंबासाठी वैयक्तिक हानीपासून संरक्षण.

४) जेव्हा लिबर्टी कंपनीने मंजूर केलेल्या तज्ज्ञ कायदेशीर/तांत्रिक सल्लागारांची मदत घेतली जाईल, तेव्हा 'इन्सिडंट कोच' सेवांसाठी ग्राहकाला कोणतीही वजावट रक्कम स्वतःच्या खिशातून द्यावी लागणार नाही.

५) तांत्रिक बिघाडामुळे व्यवसाय ठप्प होणे, पुरवठा साखळीत अडथळा येणे आणि संकट व्यवस्थापन या सर्वांसाठी हे विमा संरक्षण लागू होईल होईल

६) सुरक्षित माहितीचा नकळत आणि विनापरवाना संग्रह किंवा वापर झाल्यास, त्यासाठी निश्चित स्वरूपाचे विमा संरक्षण

७) संगणक प्रणालीच्या व्याख्येमध्ये आर्टिफिशिअल इंटेलिजन्स आणि मशीन लर्निंग आधारित उत्पादने व सेवांचाही समावेश करण्यात आला आहे.

८) पर्यायी सायबर गुन्हेगारी संरक्षणात पैशांची ऑनलाइन फसवणूक, फसव्या पद्धतीचे ट्रान्सफर, कॉम्प्युटर फ्रॉड, क्रिप्टोझॅकिंग आणि दूरसंचार फसवणूक यांसारख्या गुन्ह्यांचा समावेश आहे.

क्लेम, प्रतिसाद आणि सेवा देण्याची क्षमता :

१) वर्षभरातील ३६५ दिवस आणि २४ तास सायबर हल्ल्याच्या किंवा संकटाच्या वेळी तातडीने मदत उपलब्ध असेल.

२) लिबर्टीची टीम एका तासाच्या आत प्रतिसाद देते

३) सायबर हल्ला झाल्याची माहिती कंपनीला मिळताच, लिबर्टीची 'सायबर इन्सिडंट रिस्पॉन्स टीम' साधारणपणे एका तासाच्या आत मदतीसाठी प्रतिसाद देते. आशिया पॅसिफिक क्षेत्रातील लिबर्टीच्या मान्यताप्राप्त 'इन्सिडंट रिस्पॉन्स' डिजिटल फॉरेन्सिक आणि सायबर तपास भागीदारांची मदत ग्राहकाला त्वरित मिळू शकते.

4) स्थानिक कायदेशीर आणि नुकसान भरपाई मंजूर करण्याची प्रक्रिया हाताळण्यासाठी एक स्वतंत्र टीम असेल, ज्यांना भारतातील स्थानिक कायदे आणि तांत्रिक बाबींचे सखोल ज्ञान असेल.

5) या विम्यात सहभागी होण्याची प्रक्रिया अत्यंत सोपी व सुटसुटीत आहे. यामध्ये 'मॉक क्लेम'चा एक ऐच्छिक पर्याय मिळणार

---------------

हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी


 rajesh pande