परभणी-अवैध पिस्तुलासह संशयित आरोपी जेरबंद
परभणी, 04 जून (हिं.स.)। परभणी शहरात स्थानिक गुन्हा शाखेचे पथक गस्तीवर असताना एका संशयितास अवैध पिस्तुलासह ताब्यात घेण्यात आले. या कारवाईत पिस्तूल, जिवंत काडतूस आणि मोबाईल फोन असा एकूण 30 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ता
परभणी-अवैध पिस्तुलासह संशयित आरोपी जेरबंद


परभणी, 04 जून (हिं.स.)। परभणी शहरात स्थानिक गुन्हा शाखेचे पथक गस्तीवर असताना एका संशयितास अवैध पिस्तुलासह ताब्यात घेण्यात आले. या कारवाईत पिस्तूल, जिवंत काडतूस आणि मोबाईल फोन असा एकूण 30 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपीचे नाव शेख मुजम्मिल शेख सरफराज असे असून तो कुर्बान अलीशाह नगर परिसरातील रहिवासी आहे. पोलिसांनी संशयिताची झडती घेतली असता त्याच्याकडून 20 हजार रुपये किमतीचे एक पिस्तूल, एक जिवंत काडतूस तसेच 10 हजार रुपये किमतीचा मोबाईल फोन असा एकूण 30 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी आरोपीविरुद्ध कोतवाली पोलीस ठाण्यात भारतीय हत्यार कायद्याच्या कलम 3 व 25 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande