फीफा विश्वचषक : वेळेचा अपव्यय रोखण्यासह खेळाचा वेग वाढवण्यासाठी नवीन नियम लागू
नवी दिल्ली , 05 जून (हिं.स.)।फीफा विश्वचषक २०२६ मध्ये वेळेचा अपव्यय रोखण्यासाठी आणि खेळाचा वेग वाढवण्यासाठी काही नवीन नियम लागू करण्यात येणार आहेत. हे नियम यावर्षी फेब्रुवारीमध्ये झालेल्या आंतरराष्ट्रीय फुटबॉल असोसिएशन बोर्ड (आयएफएबी) च्या १४० व्या
फीफा विश्वचषक २०२६: वेळेचा अपव्यय रोखण्यासाठी आणि  खेळाचा वेग वाढवण्यासाठी नवीन नियम लागू


नवी दिल्ली , 05 जून (हिं.स.)।फीफा विश्वचषक २०२६ मध्ये वेळेचा अपव्यय रोखण्यासाठी आणि खेळाचा वेग वाढवण्यासाठी काही नवीन नियम लागू करण्यात येणार आहेत. हे नियम यावर्षी फेब्रुवारीमध्ये झालेल्या आंतरराष्ट्रीय फुटबॉल असोसिएशन बोर्ड (आयएफएबी) च्या १४० व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत मंजूर करण्यात आले होते आणि विश्वचषक स्पर्धेत ते आपोआप लागू होतील.

फुटबॉलचे नियम तयार करणाऱ्या आयएफएबी ने मंजूर केलेल्या या नव्या नियमांमुळे यंदाचे विश्वचषक सामने अधिक वेगवान आणि रोमांचक होण्याची अपेक्षा आहे. थ्रो-इन आणि गोल-किकसाठी वेळेची मर्यादा नियम: खेळाडूला थ्रो-इनची संधी मिळाल्यानंतर वेळ न दवडता चेंडू खेळात टाकावा लागेल.जाणीवपूर्वक खेळात विलंब केल्यास पंच शिट्टी वाजवून इशारा देतील. पंच पाच सेकंदांची उलटी गणना करतील आणि त्या वेळेत थ्रो-इन न घेतल्यास तो रद्द करून संधी प्रतिस्पर्धी संघाला दिली जाईल. गोल-किकच्या बाबतीतही वेळकाढूपणा केल्यास पंच पाच सेकंदांची गणना करतील आणि त्यानंतर प्रतिस्पर्धी संघाला कॉर्नर किक दिली जाईल.

दुखापत झालेल्या खेळाडूंसाठी नवा नियम : दुखापत झालेल्या खेळाडूला मैदानावर फिजिओकडून उपचार घेण्यासाठी निश्चित वेळमर्यादा असेल. उपचार पूर्ण झाल्यानंतर त्या खेळाडूला किमान एक मिनिट मैदानाबाहेर राहावे लागेल.

बदली खेळाडूंसाठी कठोर नियम: सामन्यादरम्यान खेळाडूची बदली करण्यासाठी १० सेकंदांची वेळमर्यादा निश्चित करण्यात आली आहे. पंचांनी बदलीचा संकेत दिल्यानंतर १० सेकंदांच्या आत बाहेर जाणारा आणि आत येणारा खेळाडू यांनी प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक असेल. १० सेकंदांत बदली पूर्ण न झाल्यास संबंधित संघाला पुढील ६० सेकंद एक खेळाडू कमी घेऊन खेळावे लागेल.

सामन्यादरम्यान व्हिडीओ असिस्टंट रेफरी (व्हिएआर ) संदर्भातील नियमांमध्येही तीन महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत. यामध्ये चुकीच्या पद्धतीने दाखविण्यात आलेल्या दुसऱ्या पिवळ्या कार्डामुळे मिळालेल्या लाल कार्डाचा व्हिएआर आढावा घेऊ शकणार आहे. त्यामुळे पंचांच्या निर्णयातील संभाव्य चुका दुरुस्त करण्यास मदत होणार आहे. ड्रॉप बॉलसंदर्भातील नवा नियम: ड्रॉप बॉलच्या प्रसंगी खेळ थांबला नसताना चेंडू ज्या संघाच्या ताब्यात असेल, त्या संघालाच पुन्हा चेंडूचा ताबा दिला जाईल.या नियमामुळे अनावश्यक वाद आणि खेळातील व्यत्यय कमी होण्यास मदत होईल. या नव्या नियमांचा मुख्य उद्देश वेळकाढूपणाला आळा घालणे, सामन्याचा वेग वाढवणे आणि प्रेक्षकांना अधिक गतिमान व मनोरंजक फुटबॉल अनुभव देणे हा आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande