बालरंगभूमी क्रिकेट लीगसाठी परभणीचा ‘प्रभावती नगरी 11’ संघ मुंबईकडे रवाना
परभणी, 05 जून, (हिं.स.) क्रिकेट हा केवळ खेळ नसून संघभावना, समन्वय आणि नेतृत्वगुण विकसित करणारे प्रभावी माध्यम आहे. बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी आणि बालरंगभूमी चळवळीला बळकटी देण्यासाठी कार्यरत असलेल्या बालरंगभूमी परिषदेच्या सभासदांमध्ये संघटनकौशल
बालरंगभूमी क्रिकेट लीगसाठी परभणीचा ‘प्रभावती नगरी 11’ संघ मुंबईकडे रवाना


परभणी, 05 जून, (हिं.स.) क्रिकेट हा केवळ खेळ नसून संघभावना, समन्वय आणि नेतृत्वगुण विकसित करणारे प्रभावी माध्यम आहे. बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी आणि बालरंगभूमी चळवळीला बळकटी देण्यासाठी कार्यरत असलेल्या बालरंगभूमी परिषदेच्या सभासदांमध्ये संघटनकौशल्य वाढावे तसेच शारीरिक तंदुरुस्तीला प्रोत्साहन मिळावे, या उद्देशाने ‘बालरंगभूमी क्रिकेट लीग’ या अनोख्या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

बालरंगभूमी परिषद मध्यवर्तीच्या अध्यक्षा अॅड. निलम शिर्के-सामंत यांच्या संकल्पनेतून 6 व 7 जून 2026 रोजी नवी मुंबईतील ऐरोली येथील युरो इंटरनॅशनल स्कूलच्या मैदानावर या राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धेचा थरार रंगणार आहे. स्पर्धेत महाराष्ट्रातील रत्नागिरी, जळगाव, पुणे, नंदुरबार, लातूर, परभणी, सांगली, इचलकरंजी, नवी मुंबई, छत्रपती संभाजीनगर, धुळे, अहिल्यानगर, ठाणे आणि कल्याण येथील बालरंगभूमी परिषदेचे अधिकृत संघ सहभागी होणार आहेत. या स्पर्धेसाठी परभणी जिल्ह्याचा ‘प्रभावती नगरी 11’ हा संघ मुंबईकडे रवाना झाला असून, संघातील खेळाडू आणि पदाधिकार्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. या स्पर्धेचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे सर्व सामने फेसबुक, इन्स्टाग्राम आणि युट्यूब या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर थेट प्रक्षेपित केले जाणार आहेत. त्यामुळे राज्यभरातील रंगकर्मी, नाट्यप्रेमी आणि क्रीडारसिकांना घरबसल्या सामन्यांचा आनंद घेता येणार आहे. बालरंगभूमी परिषदेच्या वतीने आयोजित या अनोख्या क्रीडा महोत्सवाचा सर्व बालप्रेक्षक, पालक, नाट्यप्रेमी आणि क्रीडारसिकांनी प्रत्यक्ष तसेच ऑनलाइन माध्यमातून आस्वाद घ्यावा व सहभागी खेळाडूंना प्रोत्साहन द्यावे, असे आवाहन परिषदेतर्फे करण्यात आले आहे.परभणी संघातील खेळाडू... ‘प्रभावती नगरी 11’ संघात गिरीष कर्हाडे, त्र्यंबक वडसकर, राजू वाघ, संदीप राठोड, डॉ. सौरभ वडसकर, प्रा. हनुमान व्हरगुळे, सचिन आढे, अनिकेत शेंडे, बालाजी दामुके, प्रकाश बारबिंड, अनंता शिंदे (जिंतूर), सिद्धेश्वर जाधव, अरविंद सगर, प्रा. सखाराम कदम आणि संकेत पांडे यांचा समावेश आहे. हे सर्व बालरंगभूमी परिषदेचे पदाधिकारी व सक्रिय रंगकर्मी खेळाडू म्हणून मैदानात उतरणार आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande