त्रिपुरा असो वा बिहार, आम्ही लोकसंख्येच्या रचनेत बदल होऊ देणार नाही- अमित शाह
अगरतला, 05 जून (हिं.स.)।भारत-बांगलादेश सीमेवरील सुरक्षा व्यवस्था अधिक मजबूत करण्याच्या उद्देशाने केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज त्रिपुरा येथे सीमा सुरक्षेचा आढावा घेण्यासाठी पोहोचले आहेत. यावेळी लंकामुरा सीमा चौकी (बॉर्डर आउटपोस्ट) येथे बीएसएफच्या
त्रिपुरा असो वा बिहार, आम्ही लोकसंख्येच्या रचनेत बदल होऊ देणार नाही- अमित शाह


अगरतला, 05 जून (हिं.स.)।भारत-बांगलादेश सीमेवरील सुरक्षा व्यवस्था अधिक मजबूत करण्याच्या उद्देशाने केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज त्रिपुरा येथे सीमा सुरक्षेचा आढावा घेण्यासाठी पोहोचले आहेत. यावेळी लंकामुरा सीमा चौकी (बॉर्डर आउटपोस्ट) येथे बीएसएफच्या जवानांना संबोधित करताना अमित शहा म्हणाले, “त्रिपुरा फ्रंटियर आमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. त्रिपुरा असो किंवा बिहार, आम्ही लोकसंख्येच्या रचनेत (डेमोग्राफिक) बदल होऊ देणार नाही. हा आमचा ठाम संकल्प आहे.”

अमित शाह म्हणाले, “मला आनंद आहे की केंद्रीय सशस्त्र पोलीस दल (सीएपीएफ) आणि सीमा सुरक्षा दल (बीएसएफ) यांचे सर्व जवान प्रत्येक झाडाला आपला भाऊ, बहीण किंवा मूल समजून त्याची जपणूक करत आहेत. हा उपक्रम केवळ सरकारी आदेशांमुळे प्रेरित नसावा, तर ती आपली नैसर्गिक सवय बनली पाहिजे. हीच सवय आपले भवितव्य सुरक्षित ठेवू शकते.”

अमित शहा यांनी सांगितले की, “आपल्या सुरक्षेसाठी उभारण्यात आलेल्या बीएसएफ चौक्या बांधण्यासाठी किती झाडे तोडली गेली असतील, याचा विचार आपण केला पाहिजे. त्यामुळे त्यापेक्षा अधिक झाडे लावणे ही आपली जबाबदारी आहे.”

या दौऱ्यादरम्यान केंद्रीय गृहमंत्री काही पायाभूत विकास प्रकल्पांचे भूमिपूजन आणि शिलान्यासही करणार आहेत. त्यांनी वृक्षारोपण कार्यक्रमात सहभाग घेतला तसेच जवानांच्या संमेलनाला संबोधित केले. याशिवाय, त्रिपुरा सरकार आणि एका खासगी संस्थेच्या सहकार्याने विकसित करण्यात येणाऱ्या हॉटेल प्रकल्पाच्या भूमिपूजन व शिलान्यास कार्यक्रमालाही ते उपस्थित राहणार आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande