'भूत बंगला' ठरला कोविडनंतर प्रदर्शित झालेला अक्षय कुमारचा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट
मुंबई, 08 जून (हिं.स.)।अक्षय कुमारचा ‘भूत बंगला’ हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर दमदार कामगिरी करत आहे. प्रदर्शित होऊन 50 दिवसांहून अधिक काळ उलटल्यानंतरही प्रेक्षकांकडून चित्रपटाला उत्तम प्रतिसाद मिळत आहे. आता या चित्रपटाने एक मोठा विक्रम आपल्या नावा
'भूत बंगला' ठरला कोविडनंतर प्रदर्शित झालेला अक्षय कुमारचा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट


मुंबई, 08 जून (हिं.स.)।अक्षय कुमारचा ‘भूत बंगला’ हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर दमदार कामगिरी करत आहे. प्रदर्शित होऊन 50 दिवसांहून अधिक काळ उलटल्यानंतरही प्रेक्षकांकडून चित्रपटाला उत्तम प्रतिसाद मिळत आहे. आता या चित्रपटाने एक मोठा विक्रम आपल्या नावावर केला असून, कोविडनंतर प्रदर्शित झालेल्या अक्षय कुमारच्या चित्रपटांमध्ये सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आहे.

रिपोर्टनुसार, ‘भूत बंगला’ने आतापर्यंत देशांतर्गत बॉक्स ऑफिसवर 198.43 कोटी रुपयांची नेट कमाई केली आहे. हा चित्रपट सुमारे 120 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये तयार करण्यात आला होता. त्यामुळे चित्रपटाने 78.43 कोटी रुपयांचा रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट (ROI) मिळवला आहे. परदेशी बाजारपेठेतही चित्रपटाने शानदार कामगिरी करत 57.55 कोटी रुपयांची कमाई केली आहे. यामुळे ‘भूत बंगला’ची एकूण जागतिक कमाई 291.69 कोटी रुपयांवर पोहोचली आहे.

चित्रपटाच्या आठवड्यानुसार कमाईवर नजर टाकल्यास, पहिल्या आठवड्यात 95.68 कोटी, दुसऱ्या आठवड्यात 48.23 कोटी, तिसऱ्या आठवड्यात 23.1 कोटी, चौथ्या आठवड्यात 14.2 कोटी, पाचव्या आठवड्यात 7.15 कोटी, सहाव्या आठवड्यात 5.45 कोटी आणि सातव्या आठवड्यात 4.4 कोटी रुपयांची कमाई झाली. 50 व्या दिवशी चित्रपटाने 7 लाख, तर 51 व्या दिवशी 10 लाख रुपयांचा गल्ला जमवला.

यासह ‘भूत बंगला’ने ‘हाऊसफुल 5’ लाही मागे टाकले आहे. ‘हाऊसफुल 5’नेमुंबई 198.41 कोटी रुपयांची कमाई केली होती, तर ‘भूत बंगला’ने 198.43 कोटी रुपये कमावून अक्षय कुमारच्या पोस्ट-कोविड काळातील सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटाचा मान पटकावला आहे.

या चित्रपटाचे दिग्दर्शन प्रियदर्शन यांनी केले आहे. चित्रपटात अक्षय कुमार मुख्य भूमिकेत असून, अनेक वर्षांनंतर प्रियदर्शन आणि अक्षय कुमार यांनी पुन्हा एकत्र काम केले आहे. याआधी या जोडीने ‘हेरा फेरी’ आणि ‘भूल भुलैया’ सारखे सुपरहिट चित्रपट दिले होते. आता ‘भूत बंगला’ही बॉक्स ऑफिसवर यशस्वी ठरत आहे. चित्रपटात मिथिला पालकर, वामिका गब्बी, तब्बू, परेश रावल आणि राजपाल यादव यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande