मुंंबईत बँक ऑफ इंडियाच्या 'स्ट्रॅटेजिक बिझनेस ब्रँच'चे उद्घाटन
* भागीदारी-आधारित वित्तपुरवठा उपाययोजनांना मिळणार चालना मुंबई, 08 जून (हिं.स.) : बँक ऑफ इंडियाने नुकतेच मुंबईतील नरिमन पॉईंट येथे आपल्या समर्पित स्ट्रॅटेजिक बिझनेस ब्रांचचे (SBB) उद्घाटन केले. ही एक विशेष शाखा असून, ती पूल बायआउट, को-लेंडिंग, ट्रे

स्ट्रॅटेजिक बिझनेस ब्रँच' उद्घाटन


* भागीदारी-आधारित वित्तपुरवठा उपाययोजनांना मिळणार चालना

मुंबई, 08 जून (हिं.स.) : बँक ऑफ इंडियाने नुकतेच मुंबईतील नरिमन पॉईंट येथे आपल्या समर्पित स्ट्रॅटेजिक बिझनेस ब्रांचचे (SBB) उद्घाटन केले. ही एक विशेष शाखा असून, ती पूल बायआउट, को-लेंडिंग, ट्रेड्स (TReDS) आणि सप्लाय चेन फायनान्स यांसारख्या डिजिटल आणि भागीदारी-आधारित वित्तपुरवठा व्यवसायावर लक्ष केंद्रित करते. बँकेचे एमडी आणि सीईओ श्री रजनीश कर्नाटक यांच्या हस्ते, कार्यकारी संचालक श्री पी. आर. राजगोपाल आणि बँकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत या शाखेचे उद्घाटन करण्यात आले.

याप्रसंगी बोलताना, डिजिटल लेंडिंग विभागाचे जनरल मैनेजर, श्री रवी शंकर म्हणाले, SBBचे उद्घाटन हे आमच्या भागीदारी-आधारित कर्जपुरवठा प्रणालीला अधिक मजबूत करण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे. या धोरणात्मक व्यवसाय विभागांना एका समर्पित शाखेअंतर्गत आणून, कॉर्पोरेट्सच्या बदलत्या वित्तपुरवठ्याच्या गरजांना पाठिंबा देत आम्ही विस्तारक्षमता, पोर्टफोलिओ देखरेख आणि कार्यान्वयन कार्यक्षमता वाढवण्याचे उद्दिष्ट ठेवतो.

ही शाखा भागीदारी-आधारित वित्तपुरवठ्यासाठी एक उत्कृष्टता केंद्र म्हणून काम करेल, जे मजबूत प्रशासन आणि जोखीम नियंत्रणे कायम ठेवत बँकेच्या शाश्वत व्यवसाय वाढीच्या धोरणात्मक उद्दिष्टाला पाठिंबा देईल.

---------------

हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी


 rajesh pande