
जळगाव, 08 जून (हिं.स.)जागतिक स्तरावर अमेरिका आणि इराणमधील तणावामुळे महागाई वाढत असली, तरी भारतीय सराफ बाजारातून ग्राहकांसाठी अत्यंत दिलासादायक बातमी आली आहे. आठवड्याच्या पहिल्याच दिवशी, म्हणजेच सोमवारी सकाळी बाजार उघडताच सोने आणि चांदीच्या दरात मोठी घसरण पाहायला मिळाली आहे. २४ कॅरेट सोन्याचे दर १०४० रुपयांनी (प्रति १० ग्रॅम/तोळा) घसरले आहेत, तर चांदीच्या दरात तब्बल ५००० रुपये प्रति किलोची घसरण झाली आहे. यामुळे खरेदी करणाऱ्या ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला.गुड रिटर्न्सने दिलेल्या माहितीनुसार, जळगाव सराफ बाजारात आज सकाळी २४ कॅरेटच्या १ तोळा सोन्याच्या दरामध्ये १०४० रुपयांची घसरण झाली. हे सोनं खरेदीसाठी तु्म्हाला १,५१,६९० रुपये खर्च करावे लागतील. तर २४ कॅरेटचे १० तोळा सोनं १०४०० रुपयांनी स्वस्त झालं. हे सोनं खरेदीसाठी तुम्हाला १५,१६,९०० रुपये मोजावे लागतील.तसेच २२ कॅरेटच्या १ तोळा सोन्याच्या दरामध्ये आज ९५० रुपयांची घसरण होऊन १,३९,०५० रुपये प्रति तोळ्यावर पोहोचले आहे. २४,२२ कॅरेटच्या सोन्यापाठोपाठ १८ कॅरेटच्या सोन्याच्या दरामध्ये देखील मोठी घसरण झाली आहे. १८ कॅरेटच्या १ तोळा सोन्याच्या दरामध्ये ७८० रुपयांची घसरण झाली आहे. हे सोनं खरेदीसाठी तुम्हाला १,१३,७७० रुपये खर्च करावे लागतील. आज सोन्यापाठोपाठ चांदी दरातही मोठी घसरण झाली आहे. चांदी दरात प्रति किलो ५००० रुपयापर्यंतची घसरण झाली असून यामुळे आता एक किलो चांदीसाठी २,६०,००० रुपये खर्च करावे लागतील.दरम्यान, लग्न सराई किंवा सणासुदीच्या काळात सोन्याचे दर अनेकदा कडाडलेले असतात. मात्र, आज सोन्याच्या दरात झालेली ही मोठी घसरण ग्राहकांसाठी एक ‘सुवर्णसंधी’ मानली जात आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर