पंतप्रधानांनी कुवेतच्या अमीर शेख यांच्याशी दूरध्वनीवरून साधला संवाद
नवी दिल्ली, 09 जून (हिं.स.)। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी कुवैतचे अमीर शेख मिशाल अल-अहमद अल-जाबेर अल-सबाह यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधून पश्चिम आशियातील परिस्थितीवर चर्चा केली. पंतप्रधान कार्यालयाच्या माहितीनुसार, दोन्ही नेत्यांनी पश्
MODI KUWAIT AMIR talk


नवी दिल्ली, 09 जून (हिं.स.)। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी कुवैतचे अमीर शेख मिशाल अल-अहमद अल-जाबेर अल-सबाह यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधून पश्चिम आशियातील परिस्थितीवर चर्चा केली.

पंतप्रधान कार्यालयाच्या माहितीनुसार, दोन्ही नेत्यांनी पश्चिम आशियामधील वाढता तणाव आणि सुरक्षा परिस्थितीबाबत आपापले विचार मांडले. पंतप्रधान मोदी यांनी कुवैतच्या सार्वभौमत्वावर आणि प्रादेशिक अखंडतेवर झालेल्या हल्ल्यांचा भारतातर्फे तीव्र निषेध पुन्हा व्यक्त केला आणि या मुद्द्यावर गंभीर चिंता व्यक्त केली. तसेच, पश्चिम आशिया प्रदेशात शांतता आणि स्थैर्य लवकरात लवकर प्रस्थापित व्हावे यासाठी तणाव कमी करणे, संवाद आणि राजनयिक मार्गांचा अवलंब करण्याचे आवाहन त्यांनी पुन्हा केले.या संवादादरम्यान पंतप्रधानांनी कुवैतमध्ये वास्तव्यास असलेल्या भारतीय समुदायाच्या सुरक्षिततेसाठी आणि कल्याणासाठी वैयक्तिक लक्ष दिल्याबद्दल अमीर यांचे आभारही मानले.

---------------

हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule


 rajesh pande