चोरट्यांचा धुमाकूळ : ६५ हजारांचा मुद्देमाल केला लंपास
जळगाव, 9 जून, (हिं.स.) पाचोरा शहरातील समर्थ व्हॅली येथे सुधाकर पोपट सुर्यवंशी हे आपल्या परिवारासह वास्तव्यास आहेत. सुधाकर सुर्यवंशी हे खाजगी नौकरी निमित्त मुंबई येथे असतात. तर त्यांच्या पत्नी व मुले समर्थ व्हॅली येथे राहतात. प्रियंका सुर्यवंशी ह्या
चोरट्यांचा धुमाकूळ : ६५ हजारांचा मुद्देमाल केला लंपास


जळगाव, 9 जून, (हिं.स.) पाचोरा शहरातील समर्थ व्हॅली येथे सुधाकर पोपट सुर्यवंशी हे आपल्या परिवारासह वास्तव्यास आहेत. सुधाकर सुर्यवंशी हे खाजगी नौकरी निमित्त मुंबई येथे असतात. तर त्यांच्या पत्नी व मुले समर्थ व्हॅली येथे राहतात. प्रियंका सुर्यवंशी ह्या आई व मुलांसह जळगाव येथे धोंड्याच्या कार्यक्रमासाठी घराला कुलूप लावुन गेले होते. प्रियंका सुर्यवंशी यांचा मावसभाऊ जयेश राजेंद्र पवार यांनी भ्रमणध्वनीद्वारे सांगितले की, तुमच्या घराचा कडी कोंडा तुटलेला आहे.

घटनेची माहिती मिळताच प्रियंका सुर्यवंशी ह्या पाचोरा येथे येऊन घरात प्रवेश केला असता घरातील सामान अस्ताव्यस्त फेकलेले आढळुन आले. घरातील गोदरेज कपाट उघडून बघितले असता त्यातील ३० हजार रुपये किंमतीची १ तोळा वजनाची सोन्याची पोत, १५ हजार रुपये किंमतीच्या ५ ग्रॅम व ३ ग्रॅम वजनाच्या दोन अंगठ्या व २० हजार रुपये रोख असा ६५ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल अज्ञात चोरट्याने लबाडीच्या इराद्याने चोरुन नेल्याचे उघड झाले.घटनेप्रकरणी पाचोरा पोलिस स्टेशनमध्ये प्रियंका सुर्यवंशी यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्या विरुद्ध चोरीचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर


 rajesh pande