फुटबॉलचा कुंभमेळा: 48 संघ..... 104 सामने...39 दिवस रंगणार स्पर्धा
नवी दिल्ली, 09 जून (हिं.स.) । भारतात वर्षाचे ३६५ दिवस म्हणजेच चोवीस तास क्रिकेटचा ज्वर असतो. पण दर चार वर्षांनी, फिफा विश्वचषकादरम्यान, भारतात फुटबॉलचा उत्साह देखिल शिगेला पोहोचतो. फुटबॉल चाहते गोल, संघ आणि त्यांच्या स्टार्सबद्दल चर्चा करताना दिस
फिफा विश्वचृषक ट्रॉफी


नवी दिल्ली, 09 जून (हिं.स.) । भारतात वर्षाचे ३६५ दिवस म्हणजेच चोवीस तास क्रिकेटचा ज्वर असतो. पण दर चार वर्षांनी, फिफा विश्वचषकादरम्यान, भारतात फुटबॉलचा उत्साह देखिल शिगेला पोहोचतो. फुटबॉल चाहते गोल, संघ आणि त्यांच्या स्टार्सबद्दल चर्चा करताना दिसतात. ९६ वर्षांपूर्वी, १९३० मध्ये उरुग्वे येथे झालेल्या पहिल्या विश्वचषकापासून, २०२६ मध्ये होणाऱ्या २३ व्या विश्वचषकातील संघांची संख्या वाढून ४८ झाली आहे. पहिल्यांदाच, ४८ संघांमध्ये १०४ सामने खेळले जातील आणि २३ व्या विश्वचषकाचा विजेता घोषित केला जाईल.

कशी झाली संघांची संख्या ३२ वरून ४८ ?

१९३० मध्ये उरुग्वे येथे झालेल्या पहिल्या विश्वचषकापासून ते १९७८ मध्ये अर्जेंटिना येथे झालेल्या विश्वचषकापर्यंत, संघांची संख्या १३ वरून १५ आणि नंतर ११ व्या विश्वचषकात १६ पर्यंत कमी झाली. १९८२ मध्ये स्पेन येथे झालेल्या १२ व्या विश्वचषकापासून ते १९९४ मध्ये अमेरिकेत झालेल्या १५ व्या विश्वचषकापर्यंत, स्पर्धेत सहभागी होणाऱ्या संघांची संख्या १६ वरून २४ पर्यंत वाढली. १९९८ मधील १६ व्या विश्वचषकापासून ते २०२२ मध्ये कतार येथे झालेल्या २२ व्या विश्वचषकापर्यंत, सात विश्वचषकांमध्ये ३२ संघांनी भाग घेतला. २०२६ मध्ये, प्रथमच, अमेरिका, मेक्सिको आणि कॅनडा या तीन देशांमधील १६ शहरांमध्ये ४८ संघांमध्ये १०४ सामने खेळले जातील.

फिफा विश्वचषक स्पर्धेतील संघांची संख्या ३२ वरून ४८ करण्याचा निर्णय २०१३ मध्ये युएफाचे अध्यक्ष आणि फ्रान्सचे माजी कर्णधार मिशेल प्लाटिनी यांनी, तर २०१६ मध्ये फिफाचे विद्यमान अध्यक्ष जियानी इन्फँटिनो यांनी घेतला होता. फुटबॉलची जगभरातील लोकप्रियता आणि त्याची सतत वाढणारी बाजारपेठ लक्षात घेता, अखेरीस २०२३ मध्ये फिफा विश्वचषक स्पर्धेतील संघांची संख्या ३२ वरून ४८ करण्याचा निर्णय घेण्यात आला. यामुळे आशियातील अव्वल आठ संघांना सहभागी होण्याची संधी मिळाली आहे.

कसे असेल फुटबॉल विश्वचषकाचे स्वरूप ?

विश्वचषकातील सर्व ४८ संघांची १२ गटांमध्ये विभागणी करण्यात आली आहे. सामन्यांची संख्याही सध्याच्या विश्वचषकापेक्षा ४० ने वाढून १०४ झाली आहे. सर्व गट सामने आता तीन देशांमधील १६ ठिकाणी खेळले जातील. दररोज अंदाजे तीन सामने होतील. फिफा २०२६ मध्ये, ३२ दिवसांऐवजी ३९ दिवसांत (११ जून – १९ जुलै) सामने आयोजित करण्यात आले आहेत.

पहिल्या १२ गटांपैकी प्रत्येक गटातून दोन संघ बाद फेरीसाठी पात्र ठरतील. या १२ गटांमधील तिसऱ्या क्रमांकावरील संघांपैकी आठ संघ रँकिंगच्या आधारावर नॉकआऊट फेरीसाठी पात्र ठरतील. २९ जून ते ३ जुलै दरम्यान, ३२ संघांच्या नॉकआऊट फेरीतून १६ संघ पुढे जातील. ४ जुलै ते ७ जुलै दरम्यान, १६ संघांमध्ये ८ सामने खेळले जातील. येथून पुढे स्पर्धा अधिक आव्हानात्मक होईल. जगातील अव्वल संघांनाही चुकीला वाव राहणार नाही. ४८ संघांच्या स्पर्धेतून पुढे आलेल्या ८ संघांमधील उपांत्यपूर्व फेरीचे सामने ९ ते ११ जुलै दरम्यान खेळले जातील. ९ आणि १० जुलै रोजी एक उपांत्यपूर्व फेरीचा सामना, तर ११ जुलै रोजी दोन उपांत्यपूर्व फेरीचे सामने खेळले जातील.

उपांत्य फेरीत पोहोचलेल्या चार संघांना दोन दिवसांची विश्रांती मिळेल. उपांत्य फेरीचे सामने १४ आणि १५ जुलै रोजी, तर तिसऱ्या स्थानासाठीचा सामना १८ जुलै रोजी खेळला जाईल. अंतिम सामना १९ जुलै रोजी, अमेरिकेतील न्यू जर्सी येथील मेटलाइफ स्टेडियममध्ये खेळवण्यात येणार आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे


 rajesh pande