आयर्लंड आणि इंग्लंडविरुद्धच्या टी-२० मालिकेत मोहम्मद सिराजच्या जागी प्रसीद कृष्णाला संधी
नवी दिल्ली, 09 जून, (हिं.स.)भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) मंगळवारी जाहीर केले की, वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज आगामी आयर्लंड आणि इंग्लंड टी-२० मालिकेत सहभागी होणार नाही. बीसीसीआयच्या म्हणण्यानुसार, वैद्यकीय पथक आणि संघ व्यवस्थापनाशी सल्ल
मोहम्मद सिराज


नवी दिल्ली, 09 जून, (हिं.स.)भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) मंगळवारी जाहीर केले की, वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज आगामी आयर्लंड आणि इंग्लंड टी-२० मालिकेत सहभागी होणार नाही. बीसीसीआयच्या म्हणण्यानुसार, वैद्यकीय पथक आणि संघ व्यवस्थापनाशी सल्लामसलत केल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. बीसीसीआयने सांगितले की, प्रदीर्घ आंतरराष्ट्रीय हंगामापूर्वी सिराजला पुरेशी विश्रांती आणि बरे होण्यासाठी वेळ मिळावा, यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे. हा पूर्णपणे खबरदारीचा निर्णय आहे, जेणेकरून तो आगामी महत्त्वाच्या सामन्यांसाठी पूर्णपणे तंदुरुस्त होऊ शकेल.

पुरुष निवड समितीने सिराजच्या जागी वेगवान गोलंदाज प्रसिद्ध कृष्णाला भारतीय संघात स्थान दिले आहे. प्रसिद्ध आता आयर्लंड आणि इंग्लंड या दोन्ही टी-२० मालिकांसाठी भारतीय संघाचा भाग असेल. प्रसिद्ध कृष्णा यापूर्वी भारतासाठी तिन्ही फॉरमॅटमध्ये खेळला आहे आणि तो त्याच्या अतिरिक्त उसळी आणि वेगासाठी ओळखला जातो. निवड समितीला आशा आहे की, सिराजच्या अनुपस्थितीत तो गोलंदाजीचे आक्रमण मजबूत करेल.

श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने अनेक युवा क्रिकेटपटूंना संधी दिली आहे. वैभव सूर्यवंशी, प्रिन्स यादव आणि नितीश कुमार रेड्डी या क्रिकेटपटूंच्या कामगिरीकडे लक्ष असेल. तर अभिषेक शर्मा, संजू सॅमसन, इशान किशन आणि तिलक वर्मा हे क्रिकेटपटू फलंदाजीची धुरा सांभाळतील.

आयर्लंड आणि इंग्लंड टी 20 मालिकेसाठी भारताचा अद्ययावत संघ :

श्रेयस अय्यर (कर्णधार), अभिषेक शर्मा, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), इशान किशन (यष्टीरक्षक), शिवम दुबे, तिलक वर्मा (उपकर्णधार), नितीश कुमार रेड्डी, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, वरुण चक्रवर्ती, रवी बिश्नोई, हर्षित राणा, अर्शदीप सिंग, प्रिन्स यादव, वैभव सूर्यवंशी, प्रसीध कृष्णा.

---------------

हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे


 rajesh pande