इस्रायल-इराण तणाव निवळण्याच्या शक्यतेने शेअर बाजार तेजीत बंद
नवी दिल्ली, 09 जून (हिं.स.)। इस्रायल आणि इराण यांच्यातील तणाव कमी होण्याची शक्यता तसेच कच्च्या तेलाच्या दरात झालेली नरमाई यामुळे आज देशांतर्गत शेअर बाजारात जोरदार तेजी दिसून आली आणि बाजार मजबूतीने बंद झाला. व्यवहाराची सुरुवातही वाढीसह झाली होती; मा
Stock market opens in green, Sensex jumps 239.47 points


नवी दिल्ली, 09 जून (हिं.स.)। इस्रायल आणि इराण यांच्यातील तणाव कमी होण्याची शक्यता तसेच कच्च्या तेलाच्या दरात झालेली नरमाई यामुळे आज देशांतर्गत शेअर बाजारात जोरदार तेजी दिसून आली आणि बाजार मजबूतीने बंद झाला. व्यवहाराची सुरुवातही वाढीसह झाली होती; मात्र सकाळच्या सत्रात आयटी क्षेत्रातील विक्रीमुळे सेन्सेक्स आणि निफ्टी या दोन्ही निर्देशांकांनी सुरुवातीची आघाडी गमावली आणि काही काळ ते लाल निशाणीवर गेले. दुपारी सुमारे ११.३० नंतर खरेदीचा जोर वाढताच बाजाराचा कल पुन्हा सकारात्मक झाला. परिणामी, दिवसअखेर सेन्सेक्स ०.५४ टक्के आणि निफ्टी ०.५२ टक्क्यांच्या मजबुतीसह बंद झाले.

आज बहुतेक क्षेत्रीय निर्देशांकांनीही वाढ नोंदवली. बँकिंग, ऑटोमोबाईल आणि भांडवली वस्तू क्षेत्रातील शेअर्समध्ये भरघोस खरेदी झाली. याशिवाय ग्राहक टिकाऊ वस्तू, एफएमसीजी, आरोग्यसेवा, धातू, तेल आणि वायू, तसेच सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांचे निर्देशांकही हिरव्या निशाणीवर बंद झाले. दुसरीकडे, आयटी क्षेत्रातील जोरदार विक्रीमुळे निफ्टी आयटी निर्देशांक ०.४८ टक्के आणि बीएसईचा तंत्रज्ञान निर्देशांक ०.६० टक्के घसरला. व्यापक बाजारात मात्र खरेदीचा कल कायम राहिला. त्यामुळे निफ्टी मिडकॅप निर्देशांक १.३५ टक्के आणि स्मॉलकॅप निर्देशांक १.६९ टक्क्यांच्या वाढीसह बंद झाले.

बाजारातील या तेजीमुळे गुंतवणूकदारांच्या संपत्तीत एकाच दिवसात पाच लाख कोटी रुपयांहून अधिकची वाढ झाली. बीएसईवर नोंदणीकृत कंपन्यांचे बाजारभांडवल आजच्या व्यवहारानंतर ४५९.७५ लाख कोटी रुपये इतके अनंतिम झाले, तर मागील व्यवहारदिनी ते ४५४.४० लाख कोटी रुपये होते. म्हणजेच गुंतवणूकदारांना सुमारे ५.३५ लाख कोटी रुपयांचा लाभ झाला.

व्यवहारादरम्यान बीएसईमध्ये ४,३९८ शेअर्समध्ये सक्रीय व्यवहार झाला. त्यापैकी २,७८२ शेअर्स वाढीसह बंद झाले, १,४२३ शेअर्स घसरले, तर १९३ शेअर्समध्ये कोणताही बदल दिसला नाही. एनएसईमध्ये २,९७५ शेअर्समध्ये सक्रीय व्यवहार झाला. त्यातील २,१५१ शेअर्स नफ्यात, तर ८२४ शेअर्स तोट्यात बंद झाले. सेन्सेक्समधील ३० शेअर्सपैकी १८ वाढीसह आणि १२ घसरणीसह बंद झाले, तर निफ्टीतील ५० पैकी २९ शेअर्स वाढले आणि २१ घसरले.

सेन्सेक्स ५११.१५ अंकांच्या वाढीसह ७४,०३५.४१ अंकांवर खुला झाला. मात्र सकाळी विक्रीमुळे तो ७३,४२६.१८ अंकांपर्यंत घसरला. त्यानंतर खरेदी वाढल्याने तो सावरत 394.50 अंकांच्या वाढीसह ७३,९१८.७६ अंकांवर बंद झाला. निफ्टीनेही १३६.०५ अंकांच्या वाढीसह २३,२५९.०५ अंकांवर सुरुवात केली होती. दिवसातील नीचांकी स्तर २३,१०४.४५ अंकांपर्यंत घसरल्यानंतर तो सावरत ११९.१० अंकांच्या वाढीसह २३,२४२.१० अंकांवर बंद झाला. आजच्या टॉप गेनर्समध्ये इंटरग्लोब एव्हिएशन, जिओ फायनान्शियल, आयशर मोटर्स, स्टेट बँक ऑफ इंडिया आणि आयसीआयसीआय बँक यांचा समावेश राहिला. तर ओएनजीसी, टायटन कंपनी, एनटीपीसी, पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन आणि टेक महिंद्रा हे टॉप लूजर्स ठरले.

---------------

हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule


 rajesh pande