खंडणी प्रकरणात माजी आमदार सब्यसाची दत्ता यांच्यासह टीएमसीच्या दोन नेत्यांना अटक
कोलकाता , 09 जून (हिं.स.)।पश्चिम बंगालमध्ये सत्तांतरानंतर भ्रष्टाचाराच्या विविध प्रकरणांमध्ये तृणमूल काँग्रेसच्या नेत्यांविरोधातील कारवाई सुरूच आहे. त्याच पार्श्वभूमीवर सोमवारी रात्री माजी आमदार आणि बिधाननगर महानगरपालिकेचे अध्यक्ष सब्यसाची दत्ता या
खंडणी प्रकरणात माजी आमदार सब्यसाची दत्ता यांच्यासह टीएमसीच्या दोन नेत्यांना अटक


कोलकाता , 09 जून (हिं.स.)।पश्चिम बंगालमध्ये सत्तांतरानंतर भ्रष्टाचाराच्या विविध प्रकरणांमध्ये तृणमूल काँग्रेसच्या नेत्यांविरोधातील कारवाई सुरूच आहे. त्याच पार्श्वभूमीवर सोमवारी रात्री माजी आमदार आणि बिधाननगर महानगरपालिकेचे अध्यक्ष सब्यसाची दत्ता यांना एका व्यावसायिकाकडे एक कोटी रुपयांची लाच मागितल्याच्या आरोपावरून अटक करण्यात आली.

एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, बिधाननगर महानगरपालिकेचे माजी अध्यक्ष दत्ता यांना रायगाछी येथील त्यांच्या निवासस्थानातून ताब्यात घेण्यात आले. एका व्यावसायिकाने दिलेल्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी गुन्हा दाखल करून ही कारवाई केली. बिधाननगरचे माजी महापौर असलेले दत्ता हे खंडणी वसुलीच्या कारवायांमध्ये सहभागी असल्याचा आरोप आहे.

तृणमूल काँग्रेसचे नेते दत्ता यांनी 2026 च्या विधानसभा निवडणुकीत बारासात मतदारसंघातून निवडणूक लढवली होती, मात्र त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. ते 2019 मध्ये भाजपमध्ये दाखल झाले होते, परंतु काही वर्षांनंतर त्यांनी पुन्हा मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील तृणमूल काँग्रेसमध्ये पुनरागमन केले.

दत्ता यांची अटक अशा वेळी झाली आहे, जेव्हा बिधाननगरचे माजी आमदार आणि तृणमूल सरकारमधील मंत्री सुजित बोस यांना नगरपालिकेतील नोकरी भरती घोटाळ्याप्रकरणी अंमलबजावणी संचालनालय (ईडी) ने ताब्यात घेतले आहे. दरम्यान, खंडणी वसुली आणि धमकी दिल्याच्या आरोपांवरून नंदीग्राममधील तृणमूल नेते अब्दुल अलीम अलराजी यांनाही पोलिसांनी अटक केली आहे.व दुसरीकडे, विधानसभा स्वाक्षरी प्रकरणात तृणमूल काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस अभिषेक बॅनर्जी यांना सीआयडीसमोर हजर राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande