आसावरी - शर्वरीच्या आयुष्यात येणार अनपेक्षित वळण
मुंबई, 09 जून (हिं.स.)। मालिकांमधील लग्नसोहळे हे नेहमीच चर्चेचा आणि प्रेक्षकांसाठी आकर्षणाचा विषय ठरतात. आनंद, उत्साह, भावनिक क्षण आणि अनपेक्षित खुलासे यामुळे अशा प्रसंगांना वेगळीच रंगत येते. अशा भव्य दृश्यांना प्रभावी बनवण्यासाठी कलाकार, टीम आणि
आसावरी - शर्वरीच्या आयुष्यात येणार अनपेक्षित वळण.


मुंबई, 09 जून (हिं.स.)। मालिकांमधील लग्नसोहळे हे नेहमीच चर्चेचा आणि प्रेक्षकांसाठी आकर्षणाचा विषय ठरतात. आनंद, उत्साह, भावनिक क्षण आणि अनपेक्षित खुलासे यामुळे अशा प्रसंगांना वेगळीच रंगत येते. अशा भव्य दृश्यांना प्रभावी बनवण्यासाठी कलाकार, टीम आणि वाहिनी विशेष मेहनत घेत असते. प्रत्येक बारकाव्यावर लक्ष देत साकारलेले हे प्रसंग प्रेक्षकांना खिळवून ठेवतात आणि कथानकाला नवे वळण देतात.

'सनई चौघडे' मालिकेत सध्या आसावरी आणि गौतम बांदेकर यांच्या लग्नसोहळ्याची तयारी सुरू आहे. मात्र या आनंदाच्या वातावरणात अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. गौतमने लग्न मोडणार नाही असे वचन दिले असले तरी जय आणि शर्वरीला त्याच्या हेतूंवर विश्वास नाही. गौतम काहीतरी लपवत असल्याची त्यांना खात्री वाटू लागते. त्यामुळे त्याचे सत्य सर्वांसमोर आणण्यासाठी दोघेही प्रयत्नांची पराकाष्ठा करत आहेत. एका बाजूला लग्नाचे विधी सुरू असताना दुसऱ्या बाजूला जय आणि शर्वरी पुरावे शोधण्याच्या मोहिमेत गुंतलेले आहेत. गौतमने ज्या अर्चनाची ओळख एक मुलगी म्हणून करून दिली होती, ती प्रत्यक्षात त्याची पत्नी असल्याचा संशय त्यांना आहे. अखेर योग्य वेळी जय आणि शर्वरी अर्चनासह गौतमने फसवलेल्या इतर महिलांनाही लग्नमंडपात घेऊन येणार आहेत. सर्वांसमोर हे सत्य उघड होताच उपस्थितांना मोठा धक्का बसणार आहे.

या गोंधळात तेजस्विनीदेखील लग्नस्थळी पोहोचली आहे. इथे शर्वरी आणखी एक मोठा खुलासा करणार आहे. यामुळे वातावरण पूर्णपणे बदलून जाणार आहे. या खुलास्यामुळे तेजस्विनी आणि पमा यांची प्रतिक्रिया काय असेल, तसेच या नव्या सत्याचा दोन्ही कुटुंबांवर काय परिणाम होईल, याची उत्सुकता वाढली आहे.

असावारीची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री जुई गोगरी यांनी या विशेष विवाह सोहळ्याच्या चित्रीकरणाचा अनुभव शेअर करताना सांगितले, लग्नाचे सीन करताना जितकी आव्हाने असतात, तितकीच मजाही येते. नवरीचा लूक सेट करण्यामागे अनेक लोकांची मेहनत असते आणि तो एकदा सेट झाला की पूर्ण लग्नाचे शूट होईपर्यंत तो तसाच सांभाळणे हेही एक मोठे काम असते. त्यात माझी साडी खूपच जड आहे, त्यामुळे ती सांभाळून सीन करणे म्हणजे अक्षरशः तारेवरची कसरत! लग्नाच्या सीनच्या दिवशी आम्ही रात्री २-३ वाजेपर्यंत शूट करत होतो. पण आमच्या सनई चौघडेच्या क्रूने आमची खूप काळजी घेतली. इतक्या उशिरापर्यंत शूट करून सगळेच थकलो होतो, त्यामुळे दुसऱ्या दिवशी युनिट ऑफ होता. आता आम्ही पुन्हा उरलेले लग्नाचे सीन करायला तेवढ्याच उत्साहाने आणि तयारीने सज्ज आहोत. पण या सगळ्या मेहनतीचे चीज तेव्हा होते, जेव्हा प्रेक्षकांकडून इतके भरभरून प्रेम मिळते. मला अजून एक गोष्ट सांगायची आहे, ती म्हणजे आसावरीच्या लग्नाच्या लूकबद्दल. आम्ही खास करून हेअरस्टाईलवर खूप वेळ दिला. सुरुवातीला आम्हाला जास्त गजरा वापरायचा होता. पण एक हेअरस्टाईल करून झाल्यावर लक्षात आले की गजऱ्यामुळे ती खूपच जड वाटत होती आणि इतके दिवस तो लूक कॅरी करणे कठीण झाले असते. पण आम्हाला तशीच हेअरस्टाईल हवी होती, म्हणून आम्ही गजरा थोडा कमी वापरून ती केली आणि शेवटी तो लूक खूपच सुंदर दिसला.

परब आणि खानोलकर कुटुंबाची गौतम-असावारीच्या नात्याला साथ मिळेल का ? कि जय- शर्वरीची नवी कसोटी सुरु होईल ? काय असणार नवी वळणे हे पाहण्यासाठी बघायला विसरू नका 'सनई चौघडे' दररोज रात्री ८:३० वा. सदैव तुमच्या झी मराठीवर.

---------------

हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर


 rajesh pande