लातूर - गावठी कट्टा व तीन जिवंत काडतुसे जप्त; एक आरोपी ताब्यात
लातूर, 01 जुलै (हिं.स.)। लातूर शहरात बेकायदेशीर शस्त्र बाळगणाऱ्या व्यक्तींविरुद्ध सुरू असलेल्या विशेष मोहिमेंतर्गत पोलीस ठाणे विवेकानंद चौकच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने प्रभावी कारवाई करत एका आरोपीस गावठी कट्टा व तीन जिवंत काडतुसांसह ताब्यात घेतले आ
पोलीस कारवाई


लातूर, 01 जुलै (हिं.स.)। लातूर शहरात बेकायदेशीर शस्त्र बाळगणाऱ्या व्यक्तींविरुद्ध सुरू असलेल्या विशेष मोहिमेंतर्गत पोलीस ठाणे विवेकानंद चौकच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने प्रभावी कारवाई करत एका आरोपीस गावठी कट्टा व तीन जिवंत काडतुसांसह ताब्यात घेतले आहे. या कारवाईमुळे संभाव्य गंभीर गुन्हा घडण्यापूर्वीच रोखण्यात पोलिसांना यश आले आहे.

दि. १ जुलै २०२६ रोजी दुपारी सुमारे १.२० वाजण्याच्या सुमारास गोपनीय माहितीच्या आधारे गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाने गरुड चौक परिसरात, नवीन रेणापूर नाका ते गरुड चौक मार्गावरील न्यू जयनगर येथील सार्वजनिक स्वच्छतागृहासमोरील रस्त्यावर सापळा रचला. त्यावेळी १) आतुल संजय सुपले (वय २८ वर्षे, रा. सद्गुरू नगर, जुना औसा रोड, लातूर) याची झडती घेतली असता त्याच्या ताब्यात कोणताही वैध शस्त्र परवाना नसताना एक गावठी कट्टा व तीन जिवंत काडतुसे आढळून आली.सदर शस्त्र व काडतुसे जप्त करून आरोपीविरुद्ध पोलीस ठाणे विवेकानंद चौक येथे पोलीस अंमलदार खुर्रम काझी यांच्या फिर्यादीवरून संबंधित कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस ठाणे विवेकानंद चौक करीत आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक अमोल तांबे, यांच्या निर्देशान्वे, अपर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण तथा उपविभागीय पोलीस अधिकारी, लातूर शहर समीरसिंह साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अरविंद पवार यांच्या नेतृत्वात सहाय्यक फौजदार रविंद्र गोंदकर, पोलीस अंमलदार खुर्रम काझी, गणेश यादव, रणवीर देशमुख, यशपाल कांबळे, योगेश गायकवाड, सचिन राठोड, सोनकांबळे यांनी बजावली आहे..

---------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande