
अकोला, 01 जुलै (हिं.स.)।
बार्शिटाकळी पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे निंबी येथे शेतीच्या वादातून एका तरुणाची निर्घृण हत्या झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणात स्थानिक गुन्हे शाखा (एलसीबी) अकोला आणि बार्शिटाकळी पोलिसांनी संयुक्तरित्या अत्यंत वेगाने तपास करत अवघ्या १२ तासांच्या आत सहा आरोपींना ताब्यात घेण्यात मोठे यश मिळवले आहे.दिनांक ३० जून २०२६ रोजी फिर्यादी प्रार्थना भास्कर इंगळे यांनी बार्शिटाकळी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. तक्रारीनुसार, आरोपींनी संगनमत करून त्यांचा मुलगा अनिकेत भास्कर इंगळे (वय २७) याच्याशी शेतीच्या कारणावरून वाद घातला. वादानंतर आरोपींनी अनिकेतच्या डोळ्यात मिर्ची पावडर मिश्रित पाणी फेकले आणि त्यानंतर त्याच्या डोक्यावर हातोड्याने वार करून त्याची हत्या केली.
घटनेनंतर पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करून आरोपींच्या शोधासाठी तातडीने तपास यंत्रणा सक्रिय केली.
वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशानंतर संयुक्त पथके सज्ज
या गंभीर घटनेची दखल घेत पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक नितीन लेव्हरकर आणि बार्शिटाकळीचे पोलीस निरीक्षक प्रविण धुमाळ यांना आरोपींना तातडीने अटक करण्याचे आदेश दिले.यानंतर स्थानिक गुन्हे शाखा आणि बार्शिटाकळी पोलीस स्टेशनची संयुक्त पथके तयार करण्यात आली. या पथकांनी रात्रभर शोधमोहीम राबवत पातुर व बार्शिटाकळी तालुक्यातील विविध संशयित ठिकाणे, बस स्थानके, खाजगी प्रवासी वाहतूक केंद्रे तसेच संवेदनशील भागात शोधमोहीम सुरू केली.
पातुर परिसरातून दोन आरोपींना शिताफीने पकडले
तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे आरोपी विशाल सुरेश करवते (वय २८) आणि अमोल सुरेश करवते (वय ३०), दोघेही रा. निंबी, ता. बार्शिटाकळी हे फरार होण्याच्या तयारीत असल्याची माहिती एलसीबी पथकाला मिळाली.
माहितीची खात्री करून पोलिसांनी तातडीने सापळा रचत दोन्ही आरोपींना पातुर परिसरातून घेराव घालून ताब्यात घेतले.
---------------
हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे