रत्नागिरी : राज संतोष कांबळे यांच्या तिसऱ्या स्मृतिदिनानिमित्त राज्यस्तरीय एकपात्री अभिनय स्पर्धा
रत्नागिरी, 1 जुलै (हिं.स.) । कला, संस्कृती आणि नवोदित कलाकारांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने राज संतोष कांबळे यांच्या तिसऱ्या स्मृतिदिनानिमित्त लांज्यातील राज प्रॉडक्शनतर्फे राज्यस्तरीय एकपात्री अभिनय स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.

राज्यभरातील इच्छुक स्पर्धकांसाठी ही स्पर्धा खुली असून लहान गट आणि खुला गट अशा दोन विभागांत ती पार पडणार आहे. स्पर्धेतील लहान गट (१४ वर्षांपर्यंत) यासाठी प्रवेश शुल्क १०० रुपये, तर खुला गट (१४ वर्षांवरील) यासाठी २०० रुपये निश्चित करण्यात आले आहे.

लहान गटात प्रथम क्रमांकास २२२२, द्वितीय ११११ आणि तृतीय क्रमांकास ७७७ रोख रक्कम व चषक देण्यात येणार आहे. खुल्या गटात प्रथम क्रमांकासाठी ४४४४, द्वितीय ३३३३, तृतीय २२२२ तसेच उत्तेजनार्थ ५०० रोख पारितोषिक व चषक देण्यात येणार आहेत.

स्पर्धेची प्राथमिक फेरी ऑनलाइन होणार असून स्पर्धकांनी आपल्या अभिनयाचा व्हिडिओ ७ जुलै २०२६ पर्यंत पाठवायचा आहे. प्राथमिक फेरीत निवड झालेल्या स्पर्धकांची अंतिम फेरी १२ जुलै २०२६ रोजी लांजा येथे प्रत्यक्ष पार पडणार आहे.

स्पर्धेसाठी सादरीकरणाची भाषा मराठी किंवा हिंदी असू शकते. लहान गटासाठी सादरीकरणाची वेळ २ ते ५ मिनिटे, तर खुल्या गटासाठी ५ ते ७ मिनिटे ठेवण्यात आली आहे. वेषभूषा व रंगभूषेला अतिरिक्त गुण दिले जाणार असून वेळेचे बंधन काटेकोरपणे पाळणे आवश्यक आहे.

स्पर्धेसाठी नावनोंदणी व व्हिडिओ पाठविण्यासाठी संतोष (बाबू) शेट्ये (८००७४७२४४४), राहुल तोडकरी (९८३४९२९१३१), संतोष कांबळे (कोंडकर) (८२७५५७५३६८), वैभव पाटकर (८८८८७४९५९८), प्रफुल जाधव (७७६९९७२९६५), सागर शेट्ये (९३२२८६६८६८) आणि वीरेश सांडविलकर (८४८४९७८४४२) यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी

 rajesh pande