परभणीत युको बँकेचे एटीएम फोडले; गुन्हा दाखल
परभणी, 01 जुलै (हिं.स.)। शहरातील नवा मोंढा परिसरातील युको बँक शाखा परिसरातील एटीएमची अज्ञात चोरट्याने तोडफोड करून 5 लाख 56 हजार 100 रुपये चोरून नेल्याची घटना बुधवारी (दि. 1) पहाटे तीन ते साडेतीन वाजण्याच्या सुमारास घडली. या प्रकरणी शाखा व्यवस्थापका
परभणीत युको बँकेचे एटीएम फोडले; गुन्हा दाखल


परभणी, 01 जुलै (हिं.स.)। शहरातील नवा मोंढा परिसरातील युको बँक शाखा परिसरातील एटीएमची अज्ञात चोरट्याने तोडफोड करून 5 लाख 56 हजार 100 रुपये चोरून नेल्याची घटना बुधवारी (दि. 1) पहाटे तीन ते साडेतीन वाजण्याच्या सुमारास घडली. या प्रकरणी शाखा व्यवस्थापकाच्या फिर्यादीवरून कोतवाली पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

येथील नवा मोंढा परिसरात युको बँक शाखा असून बँक इमारतीत बँकेचे एटीएम मशीन कार्यान्वित करण्यात आले आहे. या एटीएममध्ये बुधवारी पहाटे तीन ते साडेतीन या वेळात अज्ञात चोरट्याने प्रवेश करून सीसीटीव्ही कॅम-यासहीत एटीएम मशीनची तोडफोड केली. तसेच एटीएम मशीनमधील तब्बल 5 लाख 56 हजार 100 रुपये चोरून नेले. या प्रकरणी शाखा व्यवस्थापक अरविंद कुमार पांडेय यांच्या फिर्यादीवरून कोतवाली पोलिसांत भारतीय न्याय संहिता कायद्यान्वये अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास कोतवाली पोलिसांचे पोलीस उपनिरीक्षक माजीद शेख हे करीत आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande