
छत्रपती संभाजीनगर, 01 जुलै (हिं.स.)। छत्रपती संभाजीनगरच्या सिडको एन-७ परिसरातील हॉटेल सुरभीबाहेर पहाटे दोन गटांमध्ये झालेल्या हाणामारीत माजी नगरसेवक अनिल जैस्वाल यांचा मुलगा गंभीर जखमी झाला असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.
धक्का लागल्याच्या कारणावरून झालेल्या वादानंतर आरोपींनी बीअरची बाटली फोडून, दगडाने हल्ला करत त्याचे दात तोडले व हात फ्रॅक्चर केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी सिडको पोलिस ठाण्यात दोन्ही गटांच्या परस्परविरोधी तक्रारींवरून गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पोलिसांनी तातडीने कारवाई करत तीन आरोपींना अटक केली असून पुढील तपास सुरू आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis