वर्धा जिल्हा पोलिसांचे 'ऑपरेशन ऑल आऊट'; ६९ लाख ७७ हजारांचा मुद्देमाल जप्त
अमरावती, 01 जुलै (हिं.स.) वर्धा जिल्ह्यात वाढत असलेल्या अवैध व्यवसायावर आळा बसविण्याकरिता जिल्हा पोलिसांकडून जिल्ह्यात एक दिवसाचे ऑपरेश ऑल आऊट राबविण्यात आले. या मोहिमेत संपूर्ण कारवाईत गुन्हे सराईत ४१ गुन्हे दाखल करण्यात आले असून पोलिसांकडून ६९ ला
जिल्हा पोलिसांचे 'ऑपरेशन ऑल आऊट' ६९ लाख ७७ हजारांचा मुद्देमाल जप्त ः ४२ अधिकारी, २४२ कर्मचाऱ्यांचा सहभाग


अमरावती, 01 जुलै (हिं.स.) वर्धा जिल्ह्यात वाढत असलेल्या अवैध व्यवसायावर आळा बसविण्याकरिता जिल्हा पोलिसांकडून जिल्ह्यात एक दिवसाचे ऑपरेश ऑल आऊट राबविण्यात आले. या मोहिमेत संपूर्ण कारवाईत गुन्हे सराईत ४१ गुन्हे दाखल करण्यात आले असून पोलिसांकडून ६९ लाख ७७ हजार ९१८ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

या मोहिमेत पोलिस विभागातील तब्बल ४२ अधिकारी आणि २४२ कर्मचाऱ्याचा समावेश होता. त्यात चार उपविभागीय पोलिस अधिकारी, ११ ठाणेदार, स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांचा समावेश होता. या मोहिमेदरम्यान वर्धाजिल्ह्यातील सर्व पोलिस ठाण्याअंतर्गत गुन्हेगारांवर वचक बसवण्यासाठी आणि कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी व्यापक मोहीम हाती घेण्यात आली होती. या मोहिमेत जिल्ह्यातील सर्व १९ पोलिस ठाणे आणि स्थानिक गुन्हे शाखेने सहभाग नोंदवला. मोहिमेदरम्यान अवैध दारू विक्री, अमली पदार्थ, शरीरविरुद्धचे गुन्हे, मालमत्तेविरुद्धचे गुन्हे आणि आर्म्स अँक्ट अंतर्गत मोठी कारवाई करण्यात आली आहे.

दारू विक्रेत्यांसह गांजा तस्करांवर कारवाई

पोलिसांकडून या मोहिमेत अवैध दारू विक्रेत्यांवर कारवाई करण्यात आली. यात केलेल्या ४१ कारवायांमध्ये एकूण पाच लाख ३७ हजार ६५८ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तर अमली पदार्थाच्या तस्करीत असलेल्या ११ आरोपींची तपासणी करण्यात आली. ते सर्व आपापल्या घरी मिळून आले. यात एनडीपीएस कायद्यान्वये हिंगणघाट पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला असून या कारवाईत एक किलो ७५ ग्रॅम गांजा व इतर याप्रमाणे तीन लाख नऊ हजार ८४५ रुपयांचा मुद्देमाल जप्त करून पाच जणांना अटक करण्यात आली.

फरार आरोपींचा शोध

जिल्हा पोलिसांना पाहिजे असल्या आरोपींचाही यात शोध घेण्यात आला. यात पाहिजे ५८ आरोपी आणि आट फरार आरोपींचा शोध घेण्यात आला. ५८ आरोपींन तपासले केले असता ३३ गुन्हेगार हजर मिळून आले व एका गुन्हेगाराविरुद्ध जुगार कायद्यान्वये गुन्हा नोंद करण्यात आला. तर हत्यार कायद्यान्वये १२१ आरोपीतांना तपासण्यात आले. मकोका अंतर्गत फरार आरोपींचाही शोध गेण्यात आला.

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande