अयातुल्ला अली खामेनेई यांच्यावर मशहदमध्ये अंत्यसंस्कार
तेहरान , 10 जुलै (हिं.स.)।इराणचे दिवंगत सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनेई यांच्यावर गुरुवारी त्यांच्या मूळ गावी मशहद येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांना इमाम रझा दर्गा संकुलात सुपूर्द-ए-खाक करण्यात आले. यासह सहा दिवस चाललेल्या राजकीय शोककाल आण
अयातुल्ला अली खामेनेई यांच्यावर मशहदमध्ये अंत्यसंस्कार


तेहरान , 10 जुलै (हिं.स.)।इराणचे दिवंगत सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनेई यांच्यावर गुरुवारी त्यांच्या मूळ गावी मशहद येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांना इमाम रझा दर्गा संकुलात सुपूर्द-ए-खाक करण्यात आले. यासह सहा दिवस चाललेल्या राजकीय शोककाल आणि अंत्यसंस्कार कार्यक्रमाची सांगता झाली.

या काळात इराण आणि इराकमधील विविध शहरांतून लाखो नागरिकांनी अंत्ययात्रेत सहभाग घेतला. अंत्यसंस्कारापूर्वी खामेनेई यांचे पार्थिव तेहरान, कोम आणि इतर प्रमुख शहरांमध्ये नागरिकांच्या श्रद्धांजलीसाठी ठेवण्यात आले होते. अखेरच्या दिवशी त्यांचे पार्थिव मशहदमध्ये आणण्यात आले, जिथे मोठ्या संख्येने समर्थक उपस्थित होते.

अंत्ययात्रेदरम्यान “अमेरिका मुर्दाबाद” आणि “इस्रायल मुर्दाबाद” अशा घोषणा देण्यात आल्या. इराणच्या सरकारी दूरदर्शनने दिलेल्या माहितीनुसार, अयातुल्ला अली खामेनेई यांच्या अंत्ययात्राच्या मिरवणुकीचा समारोप १०१ वर्षीय अयातुल्ला हुसेन नुरी हमदानी यांनी नमाज-ए-जनाजा अदा करून झाला. हुसेन नुरी हमदानी यांचा जन्म १९२५ मध्ये झाला असून त्यांची गणना इराणमधील सर्वाधिक कट्टर धार्मिक नेत्यांमध्ये केली जाते.

अंत्यसंस्कारादरम्यान खामेनेई यांचे पुत्र आणि संभाव्य उत्तराधिकारी अयातुल्ला मोजतबा खामेनेई सार्वजनिकरीत्या कुठेही दिसून आले नाहीत. इराणी माध्यमांच्या वृत्तानुसार, सुरक्षा कारणे आणि आरोग्यविषयक परिस्थितीमुळे त्यांनी कोणत्याही सार्वजनिक कार्यक्रमात सहभाग घेतला नाही. त्यांनी केवळ लेखी संदेशाद्वारे नागरिकांचे आभार मानले.

२८ फेब्रुवारी २०२६ रोजी अमेरिका आणि इस्रायलने इराणवर केलेल्या संयुक्त हल्ल्यात अयातुल्ला अली खामेनेई आणि त्यांच्या कुटुंबातील काही सदस्यांचा मृत्यू झाला होता.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande