ट्रम्प यांच्या हत्येचा इराणकडून कट? इस्रायलचा अमेरिकेला गुप्त इशारा
वॉशिंग्टन , 10 जुलै (हिं.स.)अमेरिकेतील एका प्रतिष्ठित वृत्तपत्राने शुक्रवारी प्रसिद्ध केलेल्या एका अहवालात दावा केला आहे की, इस्रायल सरकारने अमेरिकेसोबत एक महत्त्वाची गुप्तचर माहिती (इंटेलिजन्स) शेअर केली आहे. या माहितीनुसार, इराणकडून अमेरिकेचे राष
ट्रम्प यांच्या हत्येचा इराणकडून कट? इस्रायलचा अमेरिकेला गुप्त इशारा


वॉशिंग्टन , 10 जुलै (हिं.स.)अमेरिकेतील एका प्रतिष्ठित वृत्तपत्राने शुक्रवारी प्रसिद्ध केलेल्या एका अहवालात दावा केला आहे की, इस्रायल सरकारने अमेरिकेसोबत एक महत्त्वाची गुप्तचर माहिती (इंटेलिजन्स) शेअर केली आहे. या माहितीनुसार, इराणकडून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या हत्येचा कट रचला जात असल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

इस्रायलने दिलेल्या या गुप्तचर माहितीची पुष्टी झाल्यास, ही बाब अशा वेळी समोर येत आहे जेव्हा अमेरिका आणि इराण यांच्यातील तणाव आधीच वाढलेला आहे. दोन्ही देशांकडून एकमेकांच्या ठिकाणांवर हवाई हल्ले करण्यात येत असून परिस्थिती अधिकच गंभीर बनली आहे.

इराणच्या इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्स (आयआरजीसी)ने कुद्स फोर्सचे माजी कमांडर कासिम सुलेमानी यांच्या हत्येचा बदला घेण्याची शपथ घेतली होती. कासिम सुलेमानी यांचा मृत्यू डोनाल्ड ट्रम्प यांच्या पहिल्या राष्ट्राध्यक्षीय कार्यकाळात झाला होता. सुलेमानी यांच्या हत्येसाठी करण्यात आलेल्या ड्रोन हल्ल्याचे आदेश स्वतः ट्रम्प यांनी दिले होते. त्यामुळे आयआरजीसी ट्रम्प यांनाच या कारवाईसाठी थेट जबाबदार मानते.

दरम्यान, अमेरिकेतील आणखी एक प्रमुख वृत्तवाहिनीने या वृत्ताची पुष्टी केली असून, याच आठवड्यात इस्रायलने अमेरिकेला ही गुप्तचर माहिती दिल्याचा दावा केला आहे. अमेरिकेच्या गुप्तचर संस्था देखील अशा संभाव्य धोक्याबाबत सतर्क असल्याचे सांगितले जात आहे. अहवालात असेही नमूद करण्यात आले आहे की, काही अमेरिकी अधिकाऱ्यांच्या मते, इराणविरोधात निर्णय घेताना डोनाल्ड ट्रम्प यांच्या भूमिकेवर प्रभाव टाकण्यासाठी किंवा त्यांची निर्णयक्षमता प्रभावित करण्यासाठी इस्रायली गुप्तचर यंत्रणांकडून अशा प्रकारचे मूल्यांकन सादर केले जाऊ शकते.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande