
नवी दिल्ली, १२ जुलै (हिं.स.) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'फादर अमीर' म्हणून ओळखले जाणारे कतारचे माजी अमीर, शेख हमद बिन खलिफा अल थानी यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला. त्यांनी अल थानी यांचे वर्णन एक दूरदर्शी नेते म्हणून केले, ज्यांनी कतारच्या विकासाला आणि समृद्धीला गती दिली. 'फादर अमीर' यांचे वयाच्या ७४ व्या वर्षी निधन झाले.
याप्रसंगी पंतप्रधान म्हणाले, आम्ही कतारचे राष्ट्रपिता, शेख हमद बिन खलिफा अल थानी यांच्या निधनाबद्दल तीव्र शोक व्यक्त करतो. ते एक दूरदर्शी नेते होते, ज्यांनी कतारला विकास आणि समृद्धीच्या नव्या उंचीवर नेले. आम्ही त्यांना एक सच्चा मित्र म्हणूनही स्मरतो. त्यांच्यासोबतच्या भेटीची आठवण करून देताना पंतप्रधान म्हणाले की, फेब्रुवारी २०२४ मध्ये कतारच्या त्यांच्या शेवटच्या दौऱ्यादरम्यान त्यांना भेटण्याचा बहुमान मिळाला होता.
पंतप्रधानांनी कतारचे राष्ट्रपिता, शेख तमीम बिन हमद अल थानी, संपूर्ण राजघराणे आणि कतारच्या जनतेप्रती शोक व्यक्त केला आणि त्यांच्या आत्म्यास शांती लाभो अशी प्रार्थना केली.
---------------
हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे