आता शिक्षणात क्रांती घडवण्याची वेळ- राहुल गांधी
नवी दिल्ली , 13 जुलै (हिं.स.)।काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सोमवारी म्हटले की भारताची शिक्षण व्यवस्था आता “बेईमान वसुलीचे तंत्र” बनली आहे. त्यांनी सांगितले की आता शिक्षण क्षेत्रात क्रांती घडवून आणण्याची वेळ आली आहे. “विद्यार्थ्यांचा आवाज” या अभिय
आता शिक्षणात क्रांती घडवण्याची वेळ- राहुल गांधी


नवी दिल्ली , 13 जुलै (हिं.स.)।काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सोमवारी म्हटले की भारताची शिक्षण व्यवस्था आता “बेईमान वसुलीचे तंत्र” बनली आहे. त्यांनी सांगितले की आता शिक्षण क्षेत्रात क्रांती घडवून आणण्याची वेळ आली आहे. “विद्यार्थ्यांचा आवाज” या अभियानांतर्गत विद्यार्थ्यांशी होणाऱ्या त्यांच्या दुसऱ्या संवादापूर्वी त्यांनी हे वक्तव्य केले. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी असा आरोपही केला की भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर मोदी सरकार आणि शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी मौन बाळगले आहे. त्यांनी म्हटले की दोघांनीही उत्तरदायित्वापासून पाठ फिरवली आहे.

राहुल गांधी यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर एक पोस्ट केली. त्यात त्यांनी लिहिले, “भ्रष्ट, अन्यायी, पक्षपाती, बेईमान — हे चार शब्द माझे नाहीत; आज देशातील विद्यार्थी भारताच्या शिक्षण व्यवस्थेसाठी हे शब्द वापरत आहेत. सत्य हेच आहे की भारताची शिक्षण व्यवस्था आता एक बेईमान वसुली यंत्रणा बनली आहे.” ते पुढे म्हणाले, “ज्या व्यवस्थेची निर्मिती मुलांचे भविष्य घडवण्यासाठी झाली होती, तीच व्यवस्था आज त्यांना आणि त्यांच्या कुटुंबियांना कर्ज, ताणतणाव आणि निराशेकडे ढकलत आहे.”

काँग्रेस नेत्यांनी म्हटले की, “याच भ्रष्टाचारामुळे पेपरफुटी माफियांचा जन्म झाला आहे. हे माफिया तयारी करणाऱ्या लाखो विद्यार्थ्यांच्या अनेक वर्षांच्या मेहनतीची लूट एका क्षणात करतात.” ते पुढे म्हणाले, “येथे दोषी कंत्राटदार आणि अधिकाऱ्यांना नवी कंत्राटे आणि पदोन्नती मिळते. पण शिक्षा कोणाला होते? त्या विद्यार्थ्यांना, ज्यांना तुटलेल्या स्वप्नांसह एकटे सोडले जाते.” त्यांनी आरोप केला की, “मोदी सरकार आणि शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान हे सर्व पाहत आहेत. पण त्यांनी मौनाचा मार्ग स्वीकारला आहे. उत्तरदायित्वापासून दूर पळ काढला आहे. आणि माध्यमांमध्ये? फक्त एक दीर्घ शांतता आहे.”

राहुल गांधी म्हणाले, “आता पुरे झाले. आता शिक्षणात क्रांती घडवण्याची वेळ आली आहे.” त्यांनी विद्यार्थ्यांना आवाहन केले की १७ जुलै रोजी देहरादून येथे त्यांच्यासोबत सहभागी व्हावे आणि “विद्यार्थ्यांचा आवाज” अभियान अधिक बळकट करावे.

राहुल गांधी यांनी १७ जून रोजी राजस्थानमधील कोटा येथे “विद्यार्थ्यांचा आवाज” या अभियानातील पहिल्या सभेला संबोधित केले होते. ते पुढे इतर शहरांमध्येही अशा सभा घेणार आहेत. कोटा येथील सभेत राहुल गांधी यांनी म्हटले होते की भारताची शिक्षण व्यवस्था ही निवडीची व्यवस्था नसून नाकारण्याची व्यवस्था बनली आहे. त्यांनी आरोप केला होता की ही व्यवस्था विद्यार्थ्यांवर आणि मध्यमवर्गीय कुटुंबांवर गरजेपेक्षा अधिक आर्थिक भार आणि मानसिक ताण टाकते. त्यांनी असेही म्हटले होते की सध्याची शिक्षण व्यवस्था अत्यंत तणावपूर्ण आणि अन्यायकारक आहे.

राहुल गांधी म्हणाले होते, “भारताची शिक्षण व्यवस्था ही वसुली करणारे यंत्र बनली आहे. आम्हाला अशी व्यवस्था हवी आहे जी तुम्हाला मोठी स्वप्ने पाहण्याची संधी देईल.”त्यांनी हेही नमूद केले होते की देशातील तरुणांना प्रचंड दुःख, तणाव आणि निराशेचा सामना करावा लागत आहे.पेपरफुटी आणि बेरोजगारी यांसारख्या मुद्द्यांवर विद्यार्थ्यांशी संवाद साधताना राहुल गांधी यांनी असेही म्हटले होते की भारताची शिक्षण व्यवस्था मुलांवर अनावश्यक दबाव आणते, त्यांना तणाव देते आणि त्यांचे मनोबल खच्ची करते.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande