
अमरावती, 14 जुलै (हिं.स.) | तालुक्यातील मौजा वाघोली शेत शिवारात जलतारा खड्यांमुळे शेतकरी प्रकाश ठाकरे यांच्या विहिरीला पाझर फुटला असून, भूजल पातळीत वाढ झाल्याचे हे द्योतक आहे. महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाकडून शेत शिवारात भूजल पातळी वाढावी म्हणून जलतारा खड्यांसाठी अनुदान योजना राबविण्यात येत आहे. या योजनेतून वाघोली येथील शेतकरी प्रकाश ठाकरे यांनी आपल्या शेतात पाच खट्टे खोदून योजनेच्या निकषानुसार व मार्गदर्शक सूचनेप्रमाणे ते भरून काढले. यासाठी त्यांनी जलतारा खट्टचांचे संशोधक जलतज्ञ्ज डॉ. पुरुषोत्तम वायाळ यांच्याशी थेट संपर्क करून सल्ला घेतला.
शिवाय प्रकाश ठाकरे हे स्वतः पाणलोट व्यवस्थापनाचे शेतकऱ्यांना प्रशिक्षण देतात. त्यांनी मूलस्थानी जलसंधारणाचे महत्त्व ओळखून स्वतःच्या शेतात पाच खड्डे खोदून घेतले. त्यामुळे त्यांच्या विहिरीच्या जल पातळीत वाढ दिसून येत आहे. जलताराच्या पाच फूट लांब, पाच फूट रुंद व सहा फुट खोल अशा एका खट्ट्यात चार महिन्यांत सुमारे ३ लाख ६० हजार लीटर पाणी साठून जमिनीत मुरविता येते. यामुळे एकाच वेळी पूर आणि भूजल पातळीत घट, यावर मात करता येते. प्रकाश ठाकरे यांना मोर्शी तालुका कृषी अधिकारी प्रथमेश माने व सहाय्यक कृषी अधिकारी दीपक घोडे यांचे सहकार्य लाभले. या योजनेंतर्गत एकरी एका खड्धाला ५ हजार ६८३ रुपये अनुदान मिळते. त्यामुळे आपल्या शेतशिवारात भूजल पातळी वाढविण्यासाठी शेतकऱ्यांनी वा योजनेचा लाभघ्यावा, असे आवाहन शेतकरी प्रकाश ठाकरे, तालुका कृषी अधिकारी प्रथमेश माने यांनी केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी