रत्नागिरी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात २१ वे मरणोत्तर देहदान
रत्नागिरी, 14 जुलै, (हिं.स.) । येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात एकविसावे मरणोत्तर देहदान झाले. मंगल भालचंद्र जोगळेकर (वय - ५९ वर्षे, राहणार - नाचणे, रत्नागिरी) यांचे काल दुपारी अल्पशा आजाराने जिल्हा शासकीय रुग्णालयात निधन झाले. त्यांनी फेब्रुवार
मंगला जोगळेकर देहदान


रत्नागिरी, 14 जुलै, (हिं.स.) । येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात एकविसावे मरणोत्तर देहदान झाले. मंगल भालचंद्र जोगळेकर (वय - ५९ वर्षे, राहणार - नाचणे, रत्नागिरी) यांचे काल दुपारी अल्पशा आजाराने जिल्हा शासकीय रुग्णालयात निधन झाले. त्यांनी फेब्रुवारी २०२५ मध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात देहदान संकल्पपत्र भरले होते. त्यांच्या व त्यांच्या कुटुंबीयांच्या इच्छेनुसार त्यांचे मरणोत्तर देहदान शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात करण्यात आले. हे महाविद्यालयातील एकविसावे देहदान होते.

कै. श्रीमती मंगल जोगळेकर यांच्या पश्चात मुलगी सौ. प्राची सावंत, जावई श्री. प्रदीप सावंत व नातवंडे असा परिवार आहे. देहदानाच्या वेळी कन्या, जावई आणि इतर नातेवाईक उपस्थित होते.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांच्या मार्गदर्शनाखाली शरीररचनाशास्त्र विभागप्रमुख डॉ. सादिकअली सय्यद, डॉ. योगिता कांबळे, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे समाजसेवा अधीक्षक रेशम जाधव व शरीररचनाशास्त्र विभागातील पूर्वा तोडणकर, भूमी पारकर, प्रियल आडिवरेकर, मिथिलेश मुरकर, मिहिर लोंढे, राज पेडणेकर, श्रेयस जोशी, श्रीपाद गांधी व रुग्णवाहिका चालक प्रीतम भोसले यांनी काम पाहिले.

देहदानासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. विनोद सांगवीकर, अतिदक्षता विभागामधील अधिपरिचारिका श्रीमती प्राजक्ता कोरगावकर व सौरभ चित्ते यांचे सहकार्य मिळाले.

---------------

हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी


 rajesh pande