अभाविप लातूर जिल्हा अभ्यासवर्ग संपन्न; नवीन जिल्हा समितीची घोषणा
लातूर, 14 जुलै (हिं.स.)। अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, लातूर जिल्ह्याचा दोन दिवसीय अभ्यास वर्ग नुकताच औसा येथील श्री मुक्तेश्वर मंदिर सभागृहात उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. या अभ्यासवर्गात संघटनात्मक बळकटी, कार्यकर्त्यांचे वैचारिक प्रबोधन आणि आग
अभाविप


लातूर, 14 जुलै (हिं.स.)। अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, लातूर जिल्ह्याचा दोन दिवसीय अभ्यास वर्ग नुकताच औसा येथील श्री मुक्तेश्वर मंदिर सभागृहात उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. या अभ्यासवर्गात संघटनात्मक बळकटी, कार्यकर्त्यांचे वैचारिक प्रबोधन आणि आगामी शैक्षणिक वर्षातील कार्ययोजना अशा विविध विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले.

अभ्यासवर्गात उद्घाटन सत्र, कार्यपद्धती, महाविद्यालयीन काम, कार्यकर्ता व्यवहार, भाषण सत्र (वंदे मातरम् १५० वर्ष), प्रवास व संपर्क, सदस्यता तसेच व्यावहारिक प्रशिक्षण अशा विविध सत्रांचे आयोजन करण्यात आले. कार्यकर्ता व्यवहार या विषयावर अभाविप देवगिरी प्रदेशाध्यक्ष प्रा. डॉ. सुरेश मुंढे यांनी मार्गदर्शन केले, तर भाषण सत्रात प्रमुख वक्ते म्हणून प्रा. संदिपान जगदाळे यांनी वंदे मातरमला १५० वर्ष पूर्ण झाले. त्यामुळे वंदे मातरमचा इतिहास सांगत कार्यकर्त्यांना राष्ट्रहित, विद्यार्थी नेतृत्व आणि संघटन विस्तारासाठी प्रेरित केले.

अभ्यासवर्गादरम्यान औसा विधानसभा मतदारसंघाचे आमदार अभिमन्यू पवार यांनी सदिच्छा भेट देऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधला. त्यांनी अभाविपच्या शैक्षणिक व सामाजिक कार्याचा गौरव करत आगामी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

यावेळी वर्ष २०२६-२७ साठी अभाविप लातूर जिल्ह्याची नवीन जिल्हा समिती घोषित करण्यात आली. प्रा. डॉ. प्रसाद कदम यांची जिल्हा प्रमुख, भागवत बिरादार यांची जिल्हा संयोजक, बालाजी हत्ते व शिवाजी जडे यांची जिल्हा सहसंयोजक, निशिगंधा बेंबळे यांची जिल्हा विद्यार्थिनी प्रमुख, ऋषिकेश अट्टल यांची जिल्हा कार्यालय मंत्री, तर ज्ञानेश्वर बिराजदार यांची जिल्हा कोष प्रमुख म्हणून निवड करण्यात आली.

तसेच प्रा. डॉ. शिवप्रसाद डोंगरे, यश आरीकर, महेश भवर, ऋतुजा अट्टल आणि तुषार जाधव यांची जिल्हा समिती सदस्य म्हणून घोषणा करण्यात आली.

अभ्यासवर्गाच्या समारोपप्रसंगी नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करण्यात आले. विद्यार्थी हित, शैक्षणिक गुणवत्ता, राष्ट्रनिष्ठा आणि संघटन विस्तार या चार प्रमुख विषयांवर अधिक प्रभावीपणे कार्य करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला. तसेच आभार प्रदर्शन ज्ञानेश्वर बिराजदार यांनी केले.

---------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande