पंढरपूरकडे निघालेल्या पायी वारीचे बीड तालुक्यातील महालक्ष्मी चौकात आगमन
बीड, 14 जुलै, (हिं.स.) - श्री संतश्रेष्ठ जगद्गुरु तुकाराम महाराज संस्थान, श्री क्षेत्र सावखेडा (ता. भोकरदन) येथून पंढरपूरकडे निघालेल्या पवित्र पायी वारीचे बीड तालुक्यातील महालक्ष्मी चौक येथे श्री देवदत्त चौरे यांच्या निवासस्थानी मुक्कामाच्या प्रसं
Q


बीड, 14 जुलै, (हिं.स.) - श्री संतश्रेष्ठ जगद्गुरु तुकाराम महाराज संस्थान, श्री क्षेत्र सावखेडा (ता. भोकरदन) येथून पंढरपूरकडे निघालेल्या पवित्र पायी वारीचे बीड तालुक्यातील महालक्ष्मी चौक येथे श्री देवदत्त चौरे यांच्या निवासस्थानी मुक्कामाच्या प्रसंगी दर्शन घेण्याचे भाग्य लाभले. वारकरी संप्रदायाची अखंड भक्ती, संत परंपरेची शिकवण आणि विठ्ठल नामाचा गजर अनुभवताना मन भक्तिभावाने भारावून गेले. सर्व वारकरी भाविकांच्या पायी वारीचा प्रवास सुखरूप, मंगलमय आणि विठुरायाच्या कृपेने यशस्वी होवो, हीच श्री विठ्ठल-रुक्मिणी चरणी प्रार्थना.

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande