विठुरायाच्या दर्शनासाठी लातूररोड - उदगीर - बीदर मार्गे अकोला पंढरपूर विशेष रेल्वे धावणार
लातूर, 14 जुलै, (हिं.स.)। आषाढी एकादशीला विठुरायाच्या दर्शनासाठी पंढरपूर येथे जाण्याकरिता विठ्ठलभक्ताची गर्दी लक्षात घेऊन प्रतिवर्षी प्रमाणे यंदाही दक्षिण मध्य रेल्वेने पंढरपूर करीता आषाढी एकादशी विशेष गाडी चलविण्याचे ठरविले आहे. रेल्वे क्र. 07635
आषाढी एकादशी निमित्त विशेष रेल्वे


लातूर, 14 जुलै, (हिं.स.)। आषाढी एकादशीला विठुरायाच्या दर्शनासाठी पंढरपूर येथे जाण्याकरिता विठ्ठलभक्ताची गर्दी लक्षात घेऊन प्रतिवर्षी प्रमाणे यंदाही दक्षिण मध्य रेल्वेने पंढरपूर करीता आषाढी एकादशी विशेष गाडी चलविण्याचे ठरविले आहे. रेल्वे क्र. 07635 अकोला – पंढरपूर शुक्रवारी 24 जुलै 2026 रोजी सुटणार आहे.

या प्रवासात दोन्ही दिशेला हिंगोली, परभणी, परळी वैजनाथ, लातूर रोड, उदगीर, भालकी, बिदर, झहीराबाद, विकाराबाद,कलबुर्गी, सोलापूर, पंढरपूर हे प्रमुख थांबे असतील. शनिवारी सकाळी ११:०० वाजता अकोला येथून सुटून ही रेल्वे लातूररोड येथे रात्री ७:४५,उदगीर येथे रात्री ८:२५ भालकी येथून ९:१७ मिनिटांनी तर बिदर ९:५० ला येईल तर पंढरपूर येथे 25 जुलैला सकाळी ८:१५ मिनिटांनी पोहचेल. परतीच्या प्रवासात शनीवारी दुपारी ३:५० वाजता पंढरपूर - अकोला विशेष रेल्वे संख्या 07636 निघेल ती बीदर येथे पहाटे ३:१०,भालकी येथे ४:२०, उदगीर येथे ५:४० तर लातूर रोड येथे ६:४५ असे थांबे घेत अकोला येथे रवीवारी दुपारी ४ वाजून ५० मिनिटांनी पोहचेल असे रेल्वे प्रशासनाने म्हटले आहे.

उदगीर मार्गे अकोला ते पंढरपूर ही गाडी सुरु होण्यासाठी उदगीर रेल्वे संघर्ष समितीने खासदार डॉ. शिवाजी काळगे, आमदार संजय बनसोडे यांच्या माध्यमातून पाठपुरावा केला असल्याची माहिती संघर्ष समितीचे सचिव मोतीलाल डोईजोडे यांनी दिली आहे तरी सर्व भाविक भक्तांनी या विशेष रेल्वेचा लाभ घ्यावा असे आवाहन केले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande