लातूर - वाहतूक नियमांचे उल्लंघन व हेल्मेटचा वापर न केल्यामुळे आणखी एक बळी
लातूर, 14 जुलै (हिं.स.)। लातूर शहरात पुन्हा एकदा वाहतूक नियमांकडे दुर्लक्ष केल्यामुळे दुर्दैवी अपघातात एका महिलेचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या घटनेच्या अनुषंगाने लातूर पोलीस नागरिकांना वाहतूक नियमांचे पालन करण्याबाबत व दुचाकीस्वारांनी हेल्मेट
अपघात


लातूर, 14 जुलै (हिं.स.)। लातूर शहरात पुन्हा एकदा वाहतूक नियमांकडे दुर्लक्ष केल्यामुळे दुर्दैवी अपघातात एका महिलेचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या घटनेच्या अनुषंगाने लातूर पोलीस नागरिकांना वाहतूक नियमांचे पालन करण्याबाबत व दुचाकीस्वारांनी हेल्मेटचा वापर करण्याबाबत आवाहन करीत आहेत.

टिना चौक, लातूर येथे झालेल्या अपघातात दुचाकी चालकाच्या निष्काळजीपणामुळे झालेल्या धडकेत संध्या संगमेश्वर स्वामी (वय ३९ वर्षे, रा. हरंगुळ खुर्द, ता. लातूर) या गंभीर जखमी झाल्या. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात संबंधित वाहनचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

प्राथमिक तपासात असे निदर्शनास आले आहे की, वाहतूक नियमांचे पालन न करणे तसेच हेल्मेटचा वापर न करणे यामुळे अपघातातील दुखापतीचे गांभीर्य वाढले. हेल्मेट हे केवळ दंड टाळण्यासाठी नसून जीव वाचविणारे सुरक्षा कवच आहे. अपघाताच्या वेळी डोक्याला होणाऱ्या गंभीर दुखापती टाळण्यासाठी दर्जेदार व मानांकित हेल्मेटचा वापर करणे अत्यंत आवश्यक आहे.

लातूर पोलीस नागरिकांना पुढील बाबींचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन करीत आहेत:

दुचाकी चालविताना चालक व मागील प्रवासी दोघांनीही हेल्मेटचा वापर करावा.

वाहन चालविताना वेगमर्यादेचे पालन करावे.

निष्काळजी, बेदरकार किंवा चुकीच्या पद्धतीने वाहन चालवू नये.

मोबाईलवर बोलत किंवा इतर विचलित करणाऱ्या गोष्टी करत वाहन चालवू नये.

मद्यपान करून वाहन चालविणे टाळावे.

वाहतूक सिग्नल, रस्ता चिन्हे व पोलिसांच्या सूचनांचे पालन करावे.

लातूर पोलीसांकडून सातत्याने वाहतूक जनजागृती मोहीम, हेल्मेट वापराबाबत प्रबोधन, तसेच वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध विशेष कारवाई करण्यात येत आहे. मात्र, केवळ पोलिसांच्या कारवाईवर अवलंबून न राहता प्रत्येक नागरिकाने स्वतःच्या आणि आपल्या कुटुंबाच्या सुरक्षिततेसाठी वाहतूक नियमांचे पालन करणे ही काळाची गरज आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande