
पुणे, 14 जुलै (हिं.स.)। आषाढी वारीसाठी पंढरपूरला जाणाऱ्या येणाऱ्या भाविक व वारकऱ्यांच्या हलक्या व जड वाहनांना शासन निर्णयानुसार ६ ते २९ जुलै २०२६ या कालावधीत पथकरातून सूट देण्यात येणार आहे. यासाठी प्रादेशिक परिवहन कार्यालय, पुणे येथे खटला विभागात स्वतंत्र कक्ष सुरू करण्यात आला आहे.
पथकर सवलतीचा स्टिकर/पास मिळविण्यासाठी वाहनधारकांनी २९ जुलै २०२६ पर्यंत कार्यालयीन वेळेत वाहनाचे नोंदणी प्रमाणपत्र, विमा, पीयूसी, कर, परवाना, योग्यता प्रमाणपत्र आदी आवश्यक कागदपत्रांसह अर्ज सादर करून पास प्राप्त करून घ्यावा, असे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी अर्चना गायकवाड यांनी केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु