छ. संभाजीनगर - विकासकामे, आरोग्यविषयक प्रलंबित प्रश्न तसेच जनहिताच्या विविध विषयांवर चर्चा
छत्रपती संभाजीनगर, 14 जुलै, (हिं.स.)। बदनापूर विधानसभा मतदारसंघातील विविध विकासकामे, आरोग्यविषयक प्रलंबित प्रश्न तसेच जनहिताच्या विविध विषयांवर आमदार नारायण कुचे यांनी अधिकाऱ्यांची सविस्तर चर्चा करण्यात आली. जालना जिल्हा परिषद येथे मुख्य कार्यका
Q


छत्रपती संभाजीनगर, 14 जुलै, (हिं.स.)। बदनापूर विधानसभा मतदारसंघातील विविध विकासकामे, आरोग्यविषयक प्रलंबित प्रश्न तसेच जनहिताच्या विविध विषयांवर आमदार नारायण कुचे यांनी अधिकाऱ्यांची सविस्तर चर्चा करण्यात आली.

जालना जिल्हा परिषद येथे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कृष्णकांत कांकरिया, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी श्री शिरीष बनसोडे तसेच जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. जयश्री भुसारी यांची सदिच्छा भेट घेऊन बदनापूर विधानसभा मतदारसंघातील विविध विकासकामे, आरोग्यविषयक प्रलंबित प्रश्न तसेच जनहिताच्या विविध विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.

मतदारसंघातील विकासकामे गुणवत्तापूर्ण व निर्धारित कालावधीत पूर्ण व्हावीत, आरोग्य सेवा अधिक सक्षम व्हाव्यात आणि नागरिकांना शासकीय योजनांचा लाभ प्रभावीपणे मिळावा, यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना करण्यात आल्या.

---------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande