अमरावतीत भरदिवसा 40 किलोचा वॉटर कूलर उचलून नेणारा 'बाहुबली चोर' चर्चेत
अमरावती, 14 जुलै (हिं.स.)| अमरावती शहरातील राजकमल चौक परिसरात भरदिवसा घडलेल्या एका धाडसी चोरीने नागरिकांमध्ये खळबळ उडाली आहे. एका अज्ञात चोरट्याने जिमच्या प्रवेशद्वारासमोर ठेवलेला तब्बल 35 ते 40 किलो वजनाचा वॉटर कूलर अक्षरशः खांद्यावर उचलून नेल्याच
अमरावतीत 'बाहुबली चोर'चा कारनामा! भरदिवसा खांद्यावर ४० किलोचा वॉटर कूलर उचलून नेला; संपूर्ण घटना CCTV मध्ये कैद


अमरावती, 14 जुलै (हिं.स.)| अमरावती शहरातील राजकमल चौक परिसरात भरदिवसा घडलेल्या एका धाडसी चोरीने नागरिकांमध्ये खळबळ उडाली आहे. एका अज्ञात चोरट्याने जिमच्या प्रवेशद्वारासमोर ठेवलेला तब्बल 35 ते 40 किलो वजनाचा वॉटर कूलर अक्षरशः खांद्यावर उचलून नेल्याची घटना घडली. विशेष म्हणजे हा संपूर्ण प्रकार परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून, चोरट्याच्या धाडसी कृत्यामुळे त्याला नागरिकांकडून 'बाहुबली चोर' अशी उपमा दिली जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, राजकमल चौक परिसरातील एका जिमसमोर वॉटर कूलर ठेवण्यात आला होता. भरदिवसा संधी साधत अज्ञात चोरटा तेथे आला आणि कोणाच्याही लक्षात न येऊ देता अवजड वॉटर कूलर थेट खांद्यावर उचलून घेऊन निघून गेला. एवढे वजन सहजपणे उचलून नेताना तो कोणतीही घाई किंवा भीती न दाखवता निघून गेल्याचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये स्पष्ट दिसत आहे. घटनेनंतर जिम संचालक सुशांत रोडे यांनी तातडीने कोतवाली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले असून, त्याच्या आधारे आरोपीची ओळख पटविण्याचे काम सुरू आहे. परिसरातील इतर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेजही तपासले जात असून चोरटा कोणत्या दिशेने पळून गेला याचा शोध घेतला जात आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande